Amol Kolhe on Ajit Pawar, Pimpri-Chinchwad : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP Sharad Pawar) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केलीये. "कसा निवडून येतो बघतोच तुला", असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांची मिमिक्री केली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. शिवाय अमोल कोल्हेंनी अजित पवारांना गुलाबी जॅकेटवरुनही टोला लगावला. जयपूरला मेळावा असेल, असं ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही (Sharad Pawar) उपस्थित होते. 


योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे, मग त्यापुढं काय?


अमोल कोल्हे म्हणाले, 1500 रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणलीये. युवकांना स्टाय पेंड दिले जाणार आहेत. मात्र ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळं स्टाय पेंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा.


मला असं समजलं की मेळावा जयपूरला आहे


अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले, उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे, मात्र मला असं समजलं की मेळावा जयपूरला आहे. कारण काहींनी पिंक कलरला पसंती दिलीये, आता कोणी कोणत्या रंगाला पसंती द्यायची. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भोसरी विधानसभेत नेमकं काय करायचं? हा खरा प्रश्न होता. पवार साहेबांच्या जादू ने अजित गव्हाणेंसारखे अनेकांची घरवापसी झाली. मुळात लोकसभेच्या प्रचारावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे भोसरी विधानसभेला वेळ देऊ शकले नाहीत. इतर जबाबदाऱ्यांमुळं त्यांना येता आलं नसेल. त्यामुळं नेमकं विरोधात काम कोणी केलं, हे सांगता येत नाही.


शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा पार पडतोय. एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. मेळाव्यापुर्वीचं शरद पवारांनी अजित गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांच्या हाती तुतारी देत अजित पवारांना मोठा धक्का दिलाय. शरद पवारांच्या या खेळीनंतर अजित पवार ही खडबडून जागे झालेत. उर्वरित माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक घेतायत. त्यानंतर अजित पवारांचा मेळावा ही पार पडणार आहे. तत्पूर्वी शरद पवार आज अजित पवारांना कोणकोणत्या मुद्द्यावरून लक्ष करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar : अमोल कोल्हे अन् सुप्रिया सुळेंचे बैठकीत प्रश्न, अजित पवार म्हणाले, तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही, थेट जीआर काढला