NEET exam scam :   यंदा देशात 24 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असताना देखील तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहे. NEET परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कमी आणि परीक्षेतील गैरप्रकाराचीच चर्चा अधिक रंगली. NEET परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून आता राजकीय नेत्यांनीही जोरदार हल्लाबोल केल आहे. नीट परीक्षेतील गोंधळावरुन राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सडकून टीका केलीये, तसंच केंद्र सरकारला देखील इशारा दिला आहे.  


अमित ठाकरे  म्हणाले,  हरियाणातील काही  विद्यार्थ्यांना ‘नीट’मध्ये  पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात? 67 मुलांना  पैकीच्या पैकी गुण? 
हे काय चालले आहे? 'नीट' ही परीक्षा  आता  खाजगी  क्लासेस आणि मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणाऱ्या दलालांच्या ताब्यात  गेली आहे का? केंद्र सरकारने तात्काळ  यावर तोडगा काढावा. अन्यथा पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन मनसे रस्त्यावर उतरेल.


विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मनसे सहन करणार नाही : अमित ठाकरे


नीट परीक्षेतील गोंधळावर अमित ठाकरे यांन संताप व्यक्त केला. पेपरफुटीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यास अजूनही यंत्रणा अपयशी का? पारदर्शकतेचा अभाव दिसून येतोय. 'नीट' परीक्षा केवळ डॉक्टर बनण्याचा मार्ग नाही तर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा आधार आहे. या परीक्षेतील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मनोबल खचले आहे आणि त्यांच्या आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने तात्काळ या गंभीर परिस्थितीचा तोडगा काढून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पालक आणि विद्यार्थ्यांना घेवून रस्त्यावर उतरेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाच्या गरिमेशी खेळ करणं, हे कदापिही सहन केलं जाणार नाही, असे अमित ठाकरे म्हणाले. 


नीटच्या परीक्षेतील गोंधळावरुन एनटीएचे उत्तर


नीटच्या परीक्षेतील गोंधळावरुन  एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्टीकरण दिलंय. एनटीए म्हटले की,  विद्यार्थ्यांच्या गुण मिळवण्याच्या क्षमतेत वाढ झाली. गुण देण्याच्या पद्धतीतही मोठे बदल झाले. तिसरा पर्यायही निवडलेल्या विद्यार्थ्यांना गुण देण्याच्या पद्धतीमुळे जास्त गुण मिळाले


नीटमध्ये मोठा घोटाळा झालाय का? 


मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल लागला. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता निकालावरून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नीट परीक्षेत एवढे गुण मिळवणं शक्य आहे का? की यात कोणता मोठा घोटाळा झालाय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.