Chhatrapati Sambhjinagar: डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत क्रेंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वातावरण तापलं आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात अमित शहांविरोधात विरोधकांनी रान उठवल्याचं दिसल्यानंतर राज्यभर या वक्तव्यावरून वातावरण तापलं असून ठिकठिकाणी आक्रमकपणे या वक्तव्याचा विरोध करण्यात येतोय.छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आंबेडकरी संघटना एकवटल्याचं दिसलं.अमित शहा यांच्या फोटोला चपला मारत जोडे मारो आंदोलन केलं गेलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून शहरातील क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात येत असून .सर्व आंबेडकरी संघटना एकत्र येवून हे आंदोलन करत आहेत.
जोडे मारो आंदोलन
डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर सभागृहात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह अमित शहांच्या फोटोला चपला फेकून मारण्यात आल्या. शहरातील क्रांती चौक परिसरात मोठ्या संख्येने अंबेडकरी संघटना शहांच्या वक्तव्याविरोधात उतरल्या होत्या. राज्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात वातावरण आक्रमक होताना दिसत असून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर सोलापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. RG राजगृह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाह यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. आंदोलकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात शिवीगाळ करत आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. संतप्त आंदोलकांनी इशारा दिला की, "अमित शाह यांनी माफी मागावी, अन्यथा ज्या दिवशी ते सोलापुरात येतील, त्या दिवशी त्यांचे कपडे फाडू." त्यांनी शाह यांच्याकडून तात्काळ पक्षाचा राजीनामा देण्याची किंवा समाजाची माफी मागण्याची मागणी केली आहे. सोलापुरातील या आंदोलनामुळे अमित शाह यांच्या विधानावर नाराजीचा सूर अधिकच तीव्र झाला आहे.
विरोधकांची कडाडून टीका
संसदेत संविधानावरील चर्चेवेळी अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख तुच्छतेने आणि उर्मटपणे केला. अमित शाह यांच्यात असे बोलण्याची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने सांगितल्याशिवाय संसदेत अशाप्रकारचे वक्तव्य करणे अमित शाह यांना शक्य नाही. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.