दिल्ली: महाराष्ट्रातील भाजप खासदारांची (BJP MP) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची (PM Narendra Modi) बैठक पार पडली. आज सकाळी १० वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाली त्यानंतर १० वाजून २५ मिनिटांनी सर्व खासदार पंतप्रधानांच्या दालनात दाखल झाले. संसदीय कामातील सहभाग तसेच पक्ष, राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. काल संसदेत गणपूर्ती झाली नव्हती त्यामुळे बेल वाजली. तर लोकसभेचा कोरम पूर्ण झाला नाही हे सरकराचे अपयश समजले जाते, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरीष्ठ मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. संसदीय कामकाजातील सहभाग वाढावा, फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित असले पाहिजे. खासदारांचे सध्याच्या मंत्रीमंडळाविषयी मत काय आहे, याचाही कानोसा पंतप्रधानांनी घेतल्याची माहिती आहे. भविष्यात विविध राज्यातील भाजप खासदारांची भेट पंतप्रधान अधिवेशनादरम्यान घेण्याची शक्यता आहे. (BJP MP)
Maharashtra BJP MP Meet PM Modi : बैठकीत कशावर झाली चर्चा
महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेमधील भाजपचे खासदार उपस्थित होते, यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदीय कामकाज यातील सहभाग आणि सरकारची प्रतिमा, खासदार करत असलेली काम याबाबतची चर्चा केली, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी त्यांची मत देखील जाणून घेतली. त्याचबरोबर संसदीय कामकाजात सहभाग घेणे, सक्रिय सहभाग नोंदवणे, याबाबत सर्व खासदारांचा मत लक्षात घेण्यात आलं. सकाळी दहा वाजता पहिल्यांदा पियुष गोयल यांच्या दालनामध्ये सर्व खासदार एकत्रित जमले होते, तिथून पुढे हे सर्व खासदार दहा वाजून 25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार काल गणपूर्ती होऊ शकलेली नव्हती, लोकसभेचे कोरम पूर्ण झालेला नव्हता, त्यामुळे बेल वाजली. जेव्हा लोकसभेमध्ये कोरम पूर्ण होत नाही बेल वाजवावी लागते, तर हे सरकारी पक्षाचं अपयश समजलं जातं, लोकसभेच्या सभागृहात किमान 50 खासदार तरी कामकाजासाठी उपस्थित असावे लागतात, आणि काल भाजपाचे खासदार आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार खूप कमी संख्येने उपस्थित होते, त्यामुळे कोरम पूर्ण झाला नाही. या सर्व बाबतीत एक व्यवस्थित फ्लोअर मॅनेजमेंट असला पाहिजे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठमंत्र्यांकडे नाराजी देखील व्यक्त केली अशी माहिती समोर आली आहे, त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे इतर राज्यातील खासदारांची अशाच प्रकारे संवाद साधणार असल्याचं आणि भेटणार असल्याची माहिती आहे.
Maharashtra BJP MP Meet PM Modi : कोणकोणते खासदार उपस्थित होते?
संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीला राज्यसभा आणि लोकसभाचे भाजप खासदार उपस्थित होते. यामध्ये राज्यसभेतून धनंजय महाडीक,अनिल बोंडे, भागवत कराड,अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, धैर्यशील पाटील, उज्ज्वल निकम तर लोकसभेतून नितीन गडकरी, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, पियुष गोयल उपस्थित होते. पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी पियुष गोयल यांच्या कार्यालयात महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक पार पडली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांच्यासोबत सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला दाखल झाले होते.