पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचं लग्न बहरीनमध्ये पार पडणार आहे. काही महिन्यांपूर्वीच जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला होता, आता यांचा विवाह सोहळा ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होणार असून या समारंभासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. तर या लग्न सोहळ्याला कोण जाणार आणि कोण जाणार नाही त्या नावांची यादी समोर आली आहे.

Continues below advertisement

Jay Pawar Rutuja Patil: जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाला कोण कोण जाणार? 

सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे, उपमुख्यमंत्री आणि जयचे वडील अजित पवार, आमदार रोहित पवार आणि त्यांची संपूर्ण फॅमिली बहरीनला रवाना झाली आहे.त्याचबरोबर युगेंद्र पवार आणि त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी देखील लग्नासाठी रवाना झाले आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार बहरीनमध्ये पूर्वीपासून जयसोबत उपस्थित आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोन नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, ते म्हणजे प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांना पण ते जाणार नाहीत त्यांचे कुटुंबीय जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.  

Jay Pawar Rutuja Patil: जय पवारांच्या लग्नाला कोण कोण जाणार नाहीत 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाकाकी पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार हे सर्वजण जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी जाणार नसल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

Jay Pawar Rutuja Patil: अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला जाणार नाहीत

मिळालेल्या माहितीनुसार श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी बेंगलोरला एका विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. नवविवाहित दांपत्य युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी बहरीन येथे पार पडणाऱ्या जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या लग्नसोहळ्यालाही अजित पवार देखील अनुपस्थित होते. नुकताच पार पडलेल्या युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळ्याला अजित पवार निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे पोहोचू शकले नव्हते. 

Jay Pawar Rutuja Patil:  लग्नसोहळ्याला फक्त ४०० पाहुण्यांना आमंत्रण 

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नसोहळ्याला फक्त ४०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे.

जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका एबीपी माझाच्या हाती लागली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचे पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.४ डिसेंबर – मेहेंदी५ डिसेंबर – हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा६ डिसेंबर – संगीत७ डिसेंबर – स्वागत समारंभ

या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.