Ajit Pawar, पुणे :  "बऱ्याच महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. त्याच महिला लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेऊ इच्छितात. हे लक्षात घ्या, तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळंच पाहिजे असेल तर सरकारची तिजोरी खाली होईल. मग ब्रम्हदेव आला तरी शक्य नाही. एका दाम्पत्याने तर लाडकी बहीणसाठी 26 वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही देतो पण फसवणूक केली तर मग आम्ही तुरुंगात ही टाकतो, मग करा चक्की पिसिंग", असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. ते पुण्यात बोलत होते. 


फ्लेक्सवर अमोल कोल्हेंचा फोटो आहे, आता ते स्थानिक खासदार 


अजित पवार म्हणाले, फ्लेक्सवर अमोल कोल्हेंचा फोटो आहे, आता ते स्थानिक खासदार आहेत. त्यामुळं प्रोटोकॉल म्हणून त्यांचा फोटो लावला. लगेच काय तर ब्रेकिंग न्यूज. अरे बाबांनो जरा मागचा-पुढचा विचार करा. हा काय पक्षाचा कार्यक्रम नाही, विविध विकास कामांचे लोकार्पण होतंय. मग तिथं प्रोटोकॉल पाळावा लागतो, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 


आता काहीही झालं तरी कांदा निर्यात बंदी होऊ देणार नाही


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आता काहीही झालं तरी कांदा निर्यात बंदी होऊ देणार नाही. इतर पिकालाही आम्ही दर मिळवून देऊ. समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. ज्ञानेश महाराजांनी वादग्रस्त अन अपमानकारक वक्तव्य करून अनेकांच्या भावना दुखावल्या. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. काही लोक इतर समाजबाबत बोलतात. यात आमच्या मित्र पक्षाचे नेतेही अशी भाषा वापरतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले अन् आपण काय करतोय. समाजात ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. सर्व-धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे अन यापुढं ही राहील, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. 


मला कोणाच्या बापाची भीती नाही, मी काय कोणाचं घोडं मारलंय का? एक मायचा लाल आणा अन् दाखवा की ह्याने चिरीमिरी घेऊन कामं केलं. पण विनाकारण नको त्या बातम्या पेरून माझी बदनामी केली जाते. ज्ञानेश महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं, तेव्हा उपस्थित महत्वाच्या व्यक्तींनी त्यांना का रोखलं नाही?  ज्ञानेश महाराज आक्षेपार्ह बोलत असताना अनेक महत्त्वाच्या व्यक्ती मंचावर होत्या. जर मी ही एखाद्या ठिकाणी चुकून आक्षेपार्ह बोलत असेन मला मंचावरील इतरांना थांबवायला हवं. अजितदादा मला तुमचं बोलणं पटत नाही, असं म्हणून मला रोखायला हवं. अथवा माझ्या समोर कोणी चुकीचं बोलत असेल तर त्या रोखण्याची जबाबदारी माझीही आहे, असंही अजित पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sitaram Yechury : ज्येष्ठ माकप नेते सिताराम येच्युरी यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास