नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) दुसऱ्या दिवशी कामांच्या स्थगितीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Vidhan Sabha) यांनी  शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis) सरकारने मंजूर झालेल्या अनेक कामंना स्थगिती दिल्याचा दावा केला. यावरुन सभागृहात विरोधकांनी एकच हल्लाबोल केला. एकीकडे राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat result live) धुरळा उडत असताना, दुसरीकडे विधानसभेतही खडाखडी पाहायला मिळाली. 


 बजेटमध्ये (Maharashtra Budget) मंजूर झालेली कामं होती, ही महाराष्ट्रातील कामं आहेत. ही कर्नाटक (Karnataka) आणि गुजरातची (Gujarat) कामं नाहीत, असा हल्लाबोल अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. आम्ही अनेक सरकारं बघितली, मनोहर जोशी, नारायण राणेंचं सरकार बघितलं, देवेंद्रजी (Devendra Fadnavis) तुमचंही सरकार 5 वर्ष बघितली. पण अशी मंजूर झालेली व्हाईट बूक झालेली कामं कधी थांबली नव्हती, असा घणाघात अजित पवारांनी केला.  


विधानसभा अध्यक्षांचा आग्रह


अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी हस्तक्षेप केला. सन्माननीय विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुद्दा लक्षात आला आहे. तुमच्या मुद्द्याची नोंद घेतली आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले. अजितदादा दोन मिनिटं खाली बसा, आता आपण कामकाज चालवूया, असा आग्रह राहुल नार्वेकर यांनी केला. 


अजित पवारांचा माईक बंद (Ajit Pawar mic Vidhan Sabha)


राहुल नार्वेकर अजित पवारांना बसण्याची विनंती करत होते, त्यावेळी अजित पवार म्हणाले, "अध्यक्ष महोदय हा प्रश्नोत्तराचा तास आहे. आम्हाला अधिकार आहे"  एकीकडे अध्यक्ष राहुल नार्वेकर विनंती करत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते, विरोधी आमदारांची घोषणाबाजी सुरु होती. त्यादरम्यान अजित पवारांचा माईक बंद करण्यात आला. 


तुमची पहिली टर्म असेल, आमची सात सात  (Ajit Pawar speech Vidhan Sabha)


उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बजेटमधील मंजूर झालेली कामं, दोन्ही सभागृहात मान्यता मिळालेल्या कामांना स्थगिती मिळणं चुकीचं आहे. आम्ही याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो. सरकार येतात-जातात, तुमची पहिली टर्म आहे, पण आमच्या सात सात टर्म झाल्या आहेत. आम्ही अनेक सरकारं बघितली. पण अशी मंजूर झालेली कामं कधी स्थगित झाली नव्हती, असा घणाघात अजित पवारांनी केला. 



देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर (Devendra Fadnavis)


दरम्यान, अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, 
"विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुद्दा मांडला,  तुम्ही सात सात वेळा निवडून आले, आम्ही कमी निवडणून आलो. पण काही गोष्टी तुमच्याचकडून शिकलो आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्या सरकारने आमची सगळी कामं रोखण्याची कामं तुम्ही केली, माझ्या मतदारसंघातील कामं तुम्ही रोखली. अनेक वर्ष भाजपच्या लोकांना नवा पैसा दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवणार नाही" 


ज्या स्थगिती दिल्या आहेत, त्यापैकी ७० टक्के स्थगिती उठवली आहे, शेवटच्या स्थगिती आहेत, त्या कामांना मंजुरी देताना कोणत्याही तरतुदी पाळल्या नाहीत. नियम न पाळता खर्च केले. त्याचा पुनर्विचार करुन आवश्यक त्या स्थगिती उठवू, कोणावरही अन्याय होणार नाही, योग्य आणि आवश्यक निर्णय घेऊ, असं फडणवीस यांनी सांगितलं. 


६ हजार कोटी रुपयांची तरतूद वाटली आणि केवळ २ हजार रुपयांची तरतूद आहे हे मी दाखवून देऊ, कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ असंही फडणवीस म्हणाले.   


VIDEO : अजित पवार - देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत जुगलबंदी 



संबंधित बातम्या


Maharashtra Gram Panchayat Result 2022: तुमच्या गावचा 'कारभारी' कोण? पाहा एका क्लिकवर