Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजप सोडून कोणासोबत देखील युती केली तरी चालेल, असं म्हणत कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Maharashtra Local Body Election 2025) अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता धाराशिवच्या (Dharashiv) कळंब नगरपरिषदेत राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.
कळंब नगरपरिषदेत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. तर भाजप आणि शिवसेनेची महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत काँग्रेसची आघाडी होणार असल्याची माहिती आहे. कळंब नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागात तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळले हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Dharashiv Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, जागा वाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला!
धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. जागा वाटपाचा फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला ठरवत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर अध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र निवडणूक आखाड्यात आहे. त्यामुळे कळंब नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
Mahad : महाडमध्ये मुस्लिम मतदारांचा तडकाफडकी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
दुसरीकडे, महाडमध्ये भाजपसोबत केलेल्या युतीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे. राष्ट्रवादीमध्ये सर्वधर्म सद्भावना माननारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही, अस स्पष्ट होतं आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाडच्या साईल नगर येथील स्नेहल जगताप यांच्या समर्थक मुस्लिम मतदारांनी शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश केलाय. मंत्री भरत गोगावले आणि शिवसेना कोकण सचिव विकास गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आपण हा प्रवेश करीत असल्याचे गांधारपाले गावचे माजी सरपंच मन्सुर ताज यांनी या प्रवेशाचे वेळी सांगितल.
महाडमध्ये भाजपला दिलेल्या जागांचा उल्लेख करीत राष्ट्रवादीची पुढील स्थिती काय असेल, असा प्रश्न प्रवेश करताना मन्सूर ताज यांनी केला आहे. साईल नगर येथील या प्रवेशामुळे शिवसेनेने महाडमध्ये राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का दिल्याचे स्पष्ट होत आहे.
Guhagar: गुहागरमध्ये बाप-बेटा एकमेकांविरुद्ध लढणार
अशातच, गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डमधून वडील आणि मुलगा आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. एकाच वॉर्डमध्ये वडील आणि मुलाची आता राजकीय लढत होणार आहे. गुहागर नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र.13 मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र अर्जुन भागडे (वडील) तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सौरभ राजेंद्र भागडे (मुलगा) हे निवडणूक लढवणार आहेत. वडील आणि मुलगा या लढतीत कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण गुहागर वासियांचे लक्ष लागेल आहे.
इतर महत्वाच्या बातम्या