Ajit pawar on Supriya Sule, Indapur : "रोज भाषण करुन आणि उणीधुणी  काढून लोकांचा रोजी रोटीचा प्रश्न मिटणार नाही. लोकांचा विकास करण्यासाठी आम्ही सत्तेत सामील झालोय. आपल्या खासदाराने कसलाही निधी आणला नाही. देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी होणार आहेत. बारामती सारखा इंदापूरचा विकास करायचा आहे", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते इंदापुरातील प्रचार सभेत बोलत होते.  


तर मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही


अजित पवार म्हणाले, कोणाच्या मनगटात किती जोर आहे, अजित पवारला चांगला माहीत आहे. कार्यकर्त्यांना धक्का लागला तर मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही. मी सांगतो की, असे म्हणत अप्पासाहेब जगदाळे यांनी इशारा दिलाय. यावेळी बोलताना अजित पवारांनी विरोधकांनाही इशारा दिलाय. कार्यकर्त्यांना धक्का लागला तर मी कोणाच्या बापाचा ऐकत नाही, असंही अजित पवारांनी म्हटलंय. 


सर्वांची कामे होण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर राहणार


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आजपर्यंत घटनेत दुरुस्ती 106 वेळ झाली. काँग्रेसने 85 वेळा घटनेत दुरुस्त केल्या. सर्व आमदार इच्छुक आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे आमदार काम करतो म्हणून काहीजण दुसरीकडे गेले आहेत.  जाती-पाती आणि नात्यागोत्याचा कधीही विचार न करता सर्वांची कामे होण्यासाठी कायमस्वरूपी तत्पर राहणार आहे. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray on Amit Shah : अमित शाह म्हणाले सावरकरांवर बोला, उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या राजकीय बापाने इंग्रजांना पाठिंबा...