Ajit Pawar on Rohit Pawar : "मित्रांनो मी तु्म्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या सभेत कोणीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो. अरे मला मतदान द्या. ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही काम दाखवा. तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालतं. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो. काही काही जण ते करणार आहेत. अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट आम्ही दिली. गळ्याची आण घेऊन सांगतो, साहेब सांगत होते, अजिबाद देऊ नको. मी साहेबांचं ऐकलं नाही. मी तिकीट दिलं. त्यानंतर म्हणाला हडपसरला उभं राहायचं. आम्ही म्हणालो तू कर्जत जामखेडला आम्ही तिथं मदत करु. आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजले आहेत. तुम्ही आमच्यावर टीका करता. तुझ्यापेक्षा कितीतर उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. बारामती येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीची सांगता सभा सभा पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी रोहित पवारांना (Rohit Pawar) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 


आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं शिंदे म्हणाले होते


अजित पवार म्हणाले, महायुतीचे घटक म्हणून आम्ही सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. दुधाचा धंदा जास्त आहे, त्याकरिता आम्ही 5 रुपये अनुदान दिलं. आचारसंहिता संपली की, दुध उत्पादकांच्या इतर समस्या दूर करु.  आम्ही सर्वांनी आरक्षणाला समर्थन दिलं. एकनाथरावांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच दर्शन घेऊन सांगितलं होतं की, आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. 


आम्हाला केंद्राचा निधी पाहिजे, राज्याचा आम्ही देणारच आहोत


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही जी साखर पिकवतो, ती आम्हाला पाठवता येईल. जो माल माझा कष्टकरी समाज पिकवतो, ती आम्हाला पाठवता येईल. त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करता येईल. आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सुटेल. ही सर्व कामे झाली पाहिजेत. तुम्ही देशाचे विकास पुरुष आहात, तसं आम्हीही आमच्या जिल्ह्यात विकास करण्याचा प्रयत्न करतोय, असं मी मोदीजींना सांगितलं. आम्हाला केंद्राचा निधी पाहिजे, राज्याचा आम्ही देणारच आहोत. आता आम्हाला पाणी पाहिजे, पाण्याचे महत्व वाढलेले आहे. पाणी पुण्याला दिलं तर आम्हाला इंदापूरला वापरता येईल. मुळशीचं धरण वाढवायचं आहे. त्यामध्ये आम्हाला तुमची मदत पाहिजे, असं म्हटलं, असंही अजित पवारांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar on Dattatray Bharne : शेतीचं पाणी बापजाद्याची इस्टेट नाही, अरे मामा जपून , तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही, शरद पवारांचा भरणे मामांवर हल्लाबोल