Ajit Pawar on Nawab Malik, Mumbai : माजी मंत्री नवाब मलिक आज (दि.3) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवारांनी मलिक यांच्यापासून अंतर राखले होते. मात्र, आज नवाब मलिक (Nawab Malik) अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला हजर होते, त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 


 "त्रास होतोय का?"  नवाब मलिकांबाबत अजित पवारांचे उत्तर 


दरम्यान, नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरुन अजित पवार यांना विधीमंडळ परिसरात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी केवळ 3 शब्दांमध्ये उत्तर दिले. त्यानंतर ते पुढे गेले. नवाब मलिक आता तुमच्यासोबत आले आहेत का? असा सवाल अजित पवारांना विचारण्यात आला होता. नवाब मलिक यांच्याबाबत प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की,  "त्रास होतोय का?" अजित पवारांनी दिलेल्या या उत्तरामुळे नवाब मलिक पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि खासकरुन महायुतीमध्ये सक्रिय होणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे.


नवाब मलिकांच्या महायुतीतील प्रवेशाला देवेंद्र फडणवीसांचा विरोध 


ईडीने कारवाई केल्यानंतर नवाब मलिक तुरुंगात होते. दरम्यान गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक यांचा जामीन झाला होता. त्यानंतर ते विधानसभेत आले होते. त्यांनी तुरुंगातून  बाहेर आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनी पत्र लिहित  नवाब मलिकांच्या महायुतीतील सहभागावरुन विरोध केला होता. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर नवाब मलिक एकप्रकारे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले होते. मात्र, आता ते पुन्हा एकदा राष्ट्र्वादीत सक्रिय होण्याची चिन्हं आहेत. 


लोकसभा निवडणुकीपासून नवाब मलिक होते दूर 


नवाब मलिक लोकसभा निवडणुकीत कोठेही सक्रिय दिसले नाहीत. मार्च महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना कुर्ला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकचा प्रचार सुरु झाला होता. मतदान प्रक्रियाही पार पडले. मात्र, नवाब मलिक या काळात सक्रिय राजकारणापासून दूरच राहिले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Nawab Malik: देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे दूर ठेवलेल्या नवाब मलिकांना अजितदादांनी बैठकीला बोलावलं, देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?