Ajit Pawar on Arunachal Pradesh Results : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपचे  46 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली. मात्र, अजित पवारांचे 3 उमेदवार निवडून आले तर 3 उमेदवार अतिशय थोडक्या मतांनी पडले आहेत.  दरम्यान, राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशमध्ये यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेसबुकच्या माध्यमांतून प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी अरुणाचल प्रदेशमध्ये मिळालेल्या यशानंतर एक फेसबुक पोस्ट केली आहे. 


तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो


अजित पवार लिहितात, अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो. 


उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद 


पुढे अजित पवार म्हणाले, विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या 10.06 टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो. 


सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मुल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे आश्वासनही अजित पवारांनी दिले. 


अजित पवार यांच्या पक्षाचे थोड्या मतांनी पराभूत झालेले उमेदवार -


नामसांग विधानसभा मतदार संघ -


नगोंगलीन बोई - 56 मतांनी पराभूत


---------


खोणसा पश्चिम विधानसभा मतदार संघ -


यांग सेन माटे - 804 मतांनी पराभूत


---------


पक्के केसांग विधानसभा मतदार संघ -


टेकी हेमू - 813 मतांनी पराभूत


इतर महत्वाच्या बातम्या 


Dindori Lok Sabha Result 2024 : कांद्याचा प्रश्न निर्णायक; भाजपच्या डॉ. भारती पवार की शरद पवार गटाचे भास्कर भगरे, विजयाचा गुलाल कोण उधळणार?