Ajit Pawar NCP on Nitesh Rane, मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वारंवार धार्मिक द्वेष वाढवणारी करणारी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण (Ajit Pawar NCP) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले आहे. 


नितेश राणे धार्मिक द्वेष पसरविणारी,  चिथावणीखोर वक्यव्ये करत आहेत, अजितदादांच्या आमदाराचा आरोप 


भाजपचे आमदार नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून जाहीर सभांमध्ये धार्मिक द्वेष पसरविणारी,  चिथावणीखोर वक्यव्ये करत आहेत. सांगली येथे एका कार्यक्रमात राणे यांनी मगील काही दिवसांपूर्वी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी चिथावणी खोर वक्तव्ये केली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.१९) रोजी आमदार राणे यांनी सांगलीतील बत्तीस शिराळा येथे एका भाषणात चिथावणीखोर वक्तव्ये केली. 


महाराष्ट्रामध्ये येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर केवळ स्वत:चे राजकारण करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आणि त्यांच्या धार्मिक स्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप आमदार सतीश चव्हाण यांनी केला आहे. 


दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता


 मुस्लिम समाजात संतापाची भावना आहे. तसेच याबाबत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र असे असताना देखील ते पुन्हा तशाच पध्दतीची वक्तव्ये करीत आहेत. यामुळे दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी सामाजिक परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी चिंता सतीश चव्हाण यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्राव्दारे व्यक्त केली आहे.


भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने दखल घ्यावी 


आमदार सतीश चव्हाण यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार राणे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने देखील त्यांच्या समाजविघातक वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे. अजित पवार यांच्या आमदाराने पत्र लिहिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?