Ajit Pawar and Devendra Fadnavis: राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात सदनिक घोटाळाप्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. नाशिक (Nashik news) जिल्हा न्यायालयाने मंगळवारी याबाबतचा निकाल दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास माणिकराव कोकाटे यांची अटक ही अटळ मानली जात आहे. आज सकाळी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते, अशी कुणकुण लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत. काहीवेळापूर्वीच अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

Continues below advertisement

या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याचा निर्णय अजितदादांवरच सोडल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी आजच्या भेटीत देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्या, असे अजित पवार यांना सांगितल्याचे समजते. ही भेट संपल्यानंतर अजित पवार हे मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या नियोजित बैठकीसाठी निघून गेले. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला माणिकराव कोकाटे हजर राहणार की नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या बाजूने नसला तरी अटक वॉरंट निघाल्यास पक्षाची कोंडी होऊ शकते. त्यामुळे आता अजित पवार आता काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nashik news:  माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटसाठी कोर्टात अर्ज

Continues below advertisement

माणिकराव कोकाटे यांच्या नावाने अटक वॉरंट काढण्यासाठी प्रथम वर्ग न्याय  न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोकाटे यांच्याविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या अंजली दिघोळे राठोड यांनी हा अर्ज दाखल केला आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. अंजली दिघोळे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष  लागले आहे. दरम्यान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Manikrao Kokate news: माणिकराव कोकाटेंना कोणत्या प्रकरणात शिक्षा झाली?

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आणखी वाचा

रात गई बात गई... पत्रकाराने 'तो' प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटे म्हणाले, नवी इनिंग जोरदार खेळणार!

ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल