Ajit Pawar: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत हळूहळू राजकीय घडामोडींना वेग येऊ लागलाय. बारामतीत जेवढं मी काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार बारामतीकरांना मिळणार नाही. 1952 पासून जे जे आमदार झाले त्या आमदारांनी काय काम केलं ते एकदा बघा असं म्हणत बारामतीतल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना चिमटा काढलाय. इकडे काकांना टोला लगावताच तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी शरद पवारांना चिमटा घेणं त्यांना परवडणार नाही असं लगेच प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी कारवाईचा इशारा दिलाय.मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात या, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. त्याचीही सध्या चांगलीच चर्चा आहे.

अजितदादांचा काकांना चिमटा!म्हणाले..

बारामतीतल्या एका कार्यक्रमात बोलताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावलाय.शरद पवार यांच्या पेक्षा बारामतीत सर्वाधिक विकास कामे आपण केली, असा दावा अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही ते बोललेत. ते म्हणाले, मी जेवढं काम केलं असा आमदार मिळणार नाही असा माझा दावा आहे. तुम्ही आजवर बारामतीचं प्रतिनिधीत्व केलेले सगळे आमदार काढा. 1952 पासून आतापर्यंत प्रत्येकाची कारकीर्द तपासा. प्रत्येकानं त्याच्या कारकीर्दीत काय केलंय. आता मी थांबणार नाही. तुम्ही लाखो मतांनी मला निवडून दिलंय.पुढची पाच वर्षे एवढी कामं करणार की आधीच्या कोणाच्याच कारकीर्दीत झालं नसेल एवढं या पाच वर्षात करणार असं आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं.  

1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केलं ते पाहा.. आणि मी केलेलं काम पाहा.. अजूनही काम करणार.   उन्हात कार्यक्रम आहे.. सावलीत भाषण असतं तर बरं झालं असते. उन्हात भाषण करायचं बरं वाटत नाही. बीडीओ ना म्हटलेलं होतं सावलीत घ्यायचं ना. उन्हात तुम्ही तापत आहात तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचे.  दरम्यान, यावर संजय राऊतांनी अजित पवारांना शरद पवारांना चिमटा काढणं परवडणार नाही असा टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय.

 

 

Ajtit Pawr : 1952 पासून एवढं काम केलेला आमदार मिळणार नाही,अजितदादांची टोलेबाजी