Ajtit Pawr : 1952 पासून एवढं काम केलेला आमदार मिळणार नाही,अजितदादांची टोलेबाजी

Ajtit Pawr : 1952 पासून एवढं काम केलेला आमदार मिळणार नाही,अजितदादांची टोलेबाजी

 बजेटमध्ये डीपीडीसीला 22000 कोटी दिले त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याचा तरतूद केली आहे.   दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी पाहिजे  बारामतीत विकास कामे करतो आहे पण काही जण वेडे वाकडे पणा करतात..एक जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते..पोलिसांना जप्त करायला सांगितले आहे  बारामतीत मी जेवढा आत्तापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केलं ते पाहा.. आणि मी केलेलं काम पाहा.. अजूनही काम करणार.   उन्हात कार्यक्रम आहे.. सावलीत भाषण असतं तर बरं झालं असते. उन्हात भाषण करायचं बरं वाटत नाही. बीडीओ ना म्हटलं होतं सावलीत घ्यायचं ना. उन्हात तुम्ही तापत आहात तो ताप माझ्यावर निघाला तर अवघड व्हायचे.  दिव्यागाना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला आहे  मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही..पण काम करताना नीट करतो त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं  परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहिला तर मी मोका लावीन.  आपली मुलं काय करत आहेत हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी.  मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात या पोटात घ्या अरे काय पोटात घ्या पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola