Dhananjay Munde On Manoj Jarange:  राज्यात मराठा आरक्षण विषय सध्या चांगलाच तापताना दिसत असून आंदोलनकर्ते आणि सरकारमध्ये उत्तर प्रत्यूत्तरांसह जोरदार टीका करताना दिसत आहेत. एकीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत असताना सरकारकडूनही जोरदार प्रत्यूत्तरे येत आहेत. दरम्यान, सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे  का ? असा असावा उपस्थित करत या मागे  काही वेगळं काही आहे का याची शंका ही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलीये.


मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे आणि सगे सोयऱ्या बाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा साठी गेल्या तीन दिवसांपासून अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमधील पारनेर येथून प्रतिक्रीया दिली आहे.


सरकारला उसंत मिळू नये म्हणून प्रयत्न सुरु


मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून ७ ऑगस्टपासून ते पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅली काढण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यायला हवा आतापर्यंतच्या आकड्यांवरून मराठा बांधवांना 80%  आरक्षण मिळाले आहे 20% साठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे  का ? असा असावा उपस्थित केला आहे. या मागे  काही वेगळं काही आहे का याची शंका ही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.


मनोज जरांगे यांचे शिवराळ भाषेत पलटवार


राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा समाजाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे (manoj Jarange) पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली 1 महिन्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जालन्यातली अंतरवाली येथून उपोषणाला सुरुवात करत सरकारवर निशाणा साधला. मात्र, मनोज जरांगे हे केवळ देवेंद्र फडणवीसांवरच टीका करत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. त्यावरूनही जरांगे भाजप नेत्यांवर शिवराळ भाषेत पलटवार करताना दिसून येतात.


पवार साहेब टेबलाखाली लपू नका, खाली मान घालून बोलू नका


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पवार साहेब टेबलाखाली लपू नका, खाली मान घालून बोलू नका, उगाच नाकातल्या नाकात गुणगुण करू नका. शिष्टमंडळाने इथे येथून काय केले हे त्यांना विचारले का? शिष्टमंडळ आले आणि फुकटात चहा पिऊन गेले.  चहाची उधारी कोण देणार? त्यात त्यांना साखर असलेले बिस्कीट नको, खारे बिस्कीट हवे. कुठून आणायचे आम्ही? तुमची शुगर वाढते त्याला आम्ही काय करू? पाणी पिऊन गेले, 20 रुपयाला बाटली असते, त्याची उधारी कुठून द्यायची? शिष्टमंडळ नुसते येतात आणि माघारी जातात. अजित पवारांना केवळ शिष्टमंडळ दिसते, असे त्यांनी म्हटले. 


हेही वाचा:


Manoj Jarange on Ajit Pawar : सरकारी शिष्टमंडळ फुकटात चहा पिऊन गेलं; 20 रुपयांची पाण्याची बाटली, शुगर फ्री बिस्कीटांसाठी आमचे पैसे खर्च झाले, मनोज जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर