Kavathe Mahankal Nagar Panchayat Election 2022: अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कवठे महंकाळ नगर पंचायतीत (Kavathe Mahankal Nagar Panchayat Election 2022) दिवंगत आर आर पाटील (R.R Patil) यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांची एकहाती सत्ता आलीय.रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर त्यांच्या विरोधी गटाला म्हणजे शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेवार निवडूण आला आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून जनतेचे आभार मानले आहेत. 


"खरंतर मी त्यावेळेस सांगितलं होतं. ताई शस्त्रक्रियेमुळं उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु, सेनापतीला आपण दाखवून द्यायचं होतं की, मावळ्यांनी गड राखलेला आहे. आज आपण कुणालाही हिणवायचं नाही. या शहरातील कार्यकर्त्यांनी नागरिकांनी ज्या आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या आपल्याला येणाऱ्या काळ्यात पूर्ण करायच्या आहेत", असं रोहित पाटील म्हणाले आहेत. ृ


कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदी करण्यात आलीय. यामुळं सगळ्यांनी आपपल्या ठिकाणी जावं, अशी विनंती रोहित पाटील यांनी आपल्या कार्यकत्याला केली. "जमावबंदीचा आदेश असल्यानं शहरामध्ये गर्दी करू नये. एकाच ठिकाण दहापेक्षा अधिक लोकांनी एकच येणं टाळावं. कोणालाही त्रास होता कामा नये. आपल्याला सर्वांना मी नमस्कार करतो, आपण आशिर्वाद दिला, त्याबद्दल आभार मानत रोहित पाटील यांनी रॅली संपल्याचं जाहीर केलं. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha