Latur Politicis News : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ( NCP Ajit Pawar group) यांच्यात तणाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या जाहीर वक्तव्यानंतर लातूरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. आरोप प्रत्यारोपाच्या सुरु झाले आहेत. अमित देशमुख यांच्या एका वक्तव्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अडचणीत आले आहेत. जाणून घेऊयात नेमकं घडलंय काय?


नेमकं काय म्हणाले होते अमित देशमुख?


लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील (MLA Babasaheb Patil) यांनी काँग्रेसला मदत करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्याबद्दल आपले आभार असे वक्तव्य अमित देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत केले होते. यावरुन पुन्हा एकदा लातूर भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यातला संघर्ष उफाळून समोर आला आहे. 


पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळू, पण मतदार काय करतील ते सांगता येणार नाही


लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे बाबासाहेब पाटील यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला त्याच प्रकारे आम्हीही प्रचार करणार. आम्ही त्यांच्याबरोबर असू मात्र भाजपाचे एकही व्यक्ती त्यांच्याबरोबर नसणार आहे, असं वक्तव्य भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं आहे. अमित देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी सांगितलेला आदेश पाळू मात्र, मतदार काय करतील ते सांगता येणार नाही, असा सूचक इशारा दिलीप देशमुख यांनी दिला आहे.


आम्ही विलासराव देशमुख  साहेब यांनी घालून दिलेल्या संस्कृतीचे पालन करतो


आम्ही एक होतो, बाबासाहेब पाटील तुम्ही आम्हाला सोडून गेलात. तुम्ही किती अडचण केली आमची असे अमित देशमुख म्हणाले. महाराष्ट्रामध्ये बदल होतो आहे. लोकसभेत बदल घडवला. आता राज्यात होणाऱ्या बदलाचे खासदार डॉ  शिवाजी काळगे हे पाहिले प्रतीक आहेत आणि बाबासाहेब पाटील  कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीत तुमची जी मदत आम्हाला झाली, त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यावर तरी आभार मानले पाहिजेत. एवढं तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख  साहेब यांनी घालून दिलेल्या संस्कृतीचे पालन करतो असं अमित देशमुख यांनी म्हंटलं आहे.    


बाबासाहेब पाटील तुम्हीच जर इकडे आलात तर... अमित देशमुखांची ऑफर


टिव्हीवर अजूनही आधून मधून बातम्या येतात काही तरी घडेल, ऐकता की नाही. तस काही घडलेच तर जे वातावरण जिल्हा बँकेत आहे ते वातावरण आपणाला जिल्ह्यात करता येईल असे अमित देशमुख म्हणाले. अहमदपूरच्या जागेसाठी काँगेसने लढले पाहिजे, असा आग्रह असतो. बाबासाहेब पाटील तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि मागणीही पूर्ण होईल असेही अमित देशमुख म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


भाजपाचं 1 मतही राष्ट्रवादीला मिळणार नाही, भाजपच्या नेत्याचं वक्तव्य, महायुतीमधील कलह वाढला?