Aaditya Thackeray on Eknath Shinde : आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी विचारपूस करण्याचे सोडून त्यांची संपत्ती कोठे आहे? याची उद्धव ठाकरे चौकशी करत होती, असा आरोप मुख्यमंत्री एकना शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. एकनाथ शिंदेंच्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Eknath Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मी यापूर्वीच सांगितले आहे की, ज्या व्यक्तीने आनंद दिघे गेल्यानंतर एवढी वर्षे शिवसेनेत जी पद घ्यायची होती ती घेतली. मंत्रीपदंही स्वीकारली, या व्यक्तीच्या आरोपांना आम्ही का उत्तर द्यायचं? आम्ही खोटं बोलणाऱ्यांना उत्तर देत नाहीत. एवढा गद्दारीचा प्रकार केला, त्यांना जनता उत्तर देईल", असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले, तर भाजपवरही जोरदार टीका केली.
संभाजीनगरमध्ये लढत ही निष्ठावान विरुद्ध गद्दार
आदित्य ठाकरे म्हणाले, तर घटनाबाह्य मुख्यमंत्री काय आरोप करतील ते करू द्या त्याला आम्ही उत्तर देणार नाही , कोण कोण काय बोलतय त्यावर लक्ष देण्यापेक्षा इतर महत्वाचे मुद्दे आहेत. महागाई आहे, 370 कलम काढल्यानंतर दहशतवाद संपेल असे म्हणणारे पुन्हा हल्ले सुरू झाले त्यावर बोलणार का? असा सवाल आदित्य यांनी केलाय. संभाजीनगरमध्ये लढत ही निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी आहे. निष्ठावान लोकांचा विजय होईल, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रीयन तरुणांना अशा पद्धतीचे वागणूक देणे चुकीचे
सगळे उद्योग महाराष्ट्राचे गुजरात मध्ये जात आहेत. त्यात महाराष्ट्रीयन तरुणांना अशा पद्धतीचे वागणूक देणे हे निश्चितपणे चुकीचं आहे. पुन्हा भाजपचा सरकार आलं तर याहून वाईट अवस्था होईल. दिघे साहेब गेल्यावर अनेक वर्षे त्यांनी अनेक पद भोगली आणि आता याना सगळं आठवतंय ते खोटारडे आहेत. त्यावर आम्ही बोलणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. खरे अग्निवीर आहेत, त्यांच्याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आज आपण पाहातोय त्यांना 21 व्या वर्षी निवृत्ती दिली जात आहे. पूर्ण ट्रेन केल्यानंतरही निवृत्ती दिली जाते. काँग्रेसने सांगितले आहे की, ही योजना संपवून आम्ही त्यांना आर्मीमध्ये रितसर नोकरी देऊ, असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या