मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना तात्काळ वाशिम जिल्ह्यात सुरू असलेले प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. विशेष म्हणजे मसुरीतील लाल बहादूर शास्त्री आयएएस ट्रेनिंस सेंटर येथे त्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे, आता पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी आता राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत असून आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यानंतर आता आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कर्जत येथील मेळाव्यातील भाषणानंतर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) पत्रकारांच्या प्रश्नांन उत्तरे दिली. त्यावेळी, पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, असे लोक राजकारणात सुद्धा नसतात, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 


अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोळ आणि त्यांची नियुक्ती वादात सापडली असून केंद्रीय स्तरावर त्याची चौकशीही सुरु झाली आहे. पूजा यांच्या वर्तनाची आणि कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून त्याचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. बनावट दिव्यांग सर्टिफिकेट सादर केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरांची दिल्लीतील एम्समधून वैद्यकीय चाचणी कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच त्यांना अजूनही सेवेतून निलंबित का करण्यात आलं नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई सुरू झाल्यानेही काहींनी समाधान व्यक्त केलं आहे. आता, राजकीय नेतेमंडळीही त्यासंदर्भात प्रतिक्रिया देत आहेत. आदित्य ठाकरे यांनी पूजा खेडकर यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना राजकीय नेतेही असे नसतात, असे म्हटले. 


पूजा खेडकर यांच्याबद्दल काय-काय मी ऐकतोय, हे तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय. मात्र,असे लोक तर राजकारणात सुद्धा नसतात, असे सुद्धा अधिकारी असतात, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच, त्यांना खरं तर मसुरीला पाठवला होतं, असेही ते म्हणाले. 


आदित्य ठाकरे बाईट ऑन विशालगड


आमची हीच भूमिका आहे, जर अतिक्रमण असेल तर ते हटवलं पाहिजे. मात्र, तिथे कोणाचंही नुकसान होऊ नये. मागील अनेक वर्षांपासून ते अतिक्रमण होतं असं कळलं. अतिक्रमण हटवला गेलं पाहिजे, पण कोणाचंही नुकसान केलं जाऊ नये, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.  


तर सरकारकडून कारवाई होईल - पाटील


पूजा खेडकर यांनी अधिकचे प्रयत्न करुन नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळाल्याचे दिसतंय. असं कुठलंही प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शपथपत्र द्यावं लागतं, ते शपथपत्र खोटं निघालं तर घेणाऱ्यावर आणि ज्यांनी ज्यांनी हे सर्टिफिकेट देण्यास मदत केली आहे, त्या प्रत्येकावर सरकारकडून कारवाई करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे. 


कठोरता कठोर कारवाई व्हावी


राज्यात सध्या प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे रोज नवे कारनामे पुढे येत आहे. यात चक्क हाय कोर्टाचे निकाल बदलायला लागले आहेत. युपीएससी सारखी संस्था  जर अशी संशयास्पद वागत असेल तर आता राहिले काय? असा सवाल  बच्चू कडू यांनी उपस्थित केली आहे. युपीएससी सारखी संस्था जर अशी वागत असेल तर त्याला सुद्धा कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, शिवाय यात जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी  असतील त्यांच्यावर देखील काठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून पुन्हा असा कोणी गुन्हा करणार नाही, याची अद्दल सरकारने घडवली पाहिजे आणि अशा प्रकारची व्यवस्था आता केली पाहिजे. अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.