ABP News C-Voter Opinion Poll : तामिळनाडूमध्ये 234 जागासांठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात या सगळ्या जागांसाठी मतदान होईल. त्यामुळे दक्षिणेत प्रचारानं जोर धरलाय. तामिळनाडूमध्ये सध्या एआयडीएमके सत्तेत आहे. तिथं मुख्यमंत्रीपदी इ. पलानीस्वामी आहेत. 2016 च्या निवडणुकीत एआयडीएमकेने 136 जागा जिंकल्यात. विरोधी पक्ष डीएमकेने 89 जागा जिंकल्या होत्या. तामिळनाडूमध्ये बहुमताचा मिळवण्यासाठी 118 आमदारांची गरज असते. एबीपी माझा आणि सी व्होटरनं इथल्याही मतदारांची मत जाणून घेतली. काय आहे इथल्या मतदारांचा मूड पाहुयात.
2021 चा ओपिनियन पोल
- युपीए (द्रमुक +कॉंग्रेस+ इतर) 158
- एनडीए –(अण्णाद्रमुक + भाजप+ इतर ) - 62
- एमएनएम( कमल हसन यांचा पक्ष) - 4
- एएमएमके (दिनकरन यांचा पक्ष) -3
- इतर – 7
युपीएला 154 ते 162 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे.
एनडीएला 58 ते 66 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती कुणाला?
- ई के पलानीस्वामी (अण्णाद्रमुक) – 32.1 टक्के
- एम के स्टॅलिन (द्रमुक) – 39.4 टक्के
विद्यमान राज्य सरकारच्या कारभारावर किती लोक समाधानी आहेत?
- खूप समाधानी – 7.21 टक्के
- काही प्रमाणात समाधानी – 43.24 टक्के
- असमाधानी – 31.47 टक्के
- सांगता येत नाही – 18 टक्के
ओपिनियन पोलनुसार तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डीएमकेला सत्ता मिळू शकते. तर मुख्यमंत्रीपदासाठी डीएमकेच्या स्टॅलिन यांनाच जास्त पसंती मिळताना दिसत आहे.