ट्रेंडिंग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल होताच मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला! https://tinyurl.com/esbsn9wm मी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलाय, त्यांना पदमुक्त केलंय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना दिली माहिती https://tinyurl.com/32d3ed8z
2. धनंजय मुडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली नाही, देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग आणणार; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर नाना पटोले संतप्त https://tinyurl.com/22hypd7h धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया, धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी, तर सरकार बरखास्तीसह विविध मागण्या https://tinyurl.com/4k6at6vk
3. धनंजय मुंडेंना आमदारकीसकट मंत्रिपदावरून उचलून फेका, 302 दाखल करा, देशमुख कुटुंबियांना भेटताच मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; म्हणाले, संतोष भैय्यांचा बदला होणार https://tinyurl.com/392r98yd मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला, गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडले https://tinyurl.com/evmwzfa3
4. धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं, राजीनामा आधीच द्यायला हवा होता; पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/w4e7pdzz वाल्मिक अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं पंकजाताई म्हणाल्या होत्या, मग संतोष देशमुखांच्या खुनाचं पान परस्पर कसं हललं? सुरेश धसांचा सवाल https://tinyurl.com/b2tstsnj 'कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली', जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा, व्हायरल फोटोवर म्हणाले, त्या दोन मुलांना आयुष्यभर काय वाटेल? https://tinyurl.com/4w3nw2cw
5. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील इतर नेत्यांना लाभ होण्याची शक्यता; भुजबळांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची चिन्हं, आणखी 3 नेत्यांच्या नावाचीही चर्चा https://tinyurl.com/4b5hzkux धनंजय मुंडेंचा राजीनामा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचंही ठरलं; ठाण्यातून रान पेटवणार, आरोपींच्या फाशीची मागणी करत राज्यभर आंदोलन करणार https://tinyurl.com/57wt724e
6. माझ्याविरुद्ध जे बोललेत त्यांना धडा शिकवेन, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर अंजली दमानियांचा संताप, म्हणाल्या, बघू आपण, शिकवा धडा https://tinyurl.com/2wzcrmbs आरोपींनी केलेली ती लघवी संतोष देशमुखांच्या तोंडावर नाही, शासन प्रशासनाच्या कारभारावर; करुणा शर्मांचा हल्लाबोल https://tinyurl.com/bddmvfkb
7. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब; अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र सोपवलं, तर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस करणार दावा https://tinyurl.com/4s4sa3f7 खोट्या कागदपत्रांच्या आधारे चक्क माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची 26 एकर जमीन हडपली; न्यायालयाकडून जमीन परत देण्याचे मंत्री जयकुमार रावल यांना आदेश; माजी आमदार अनिल गोटेंची माहिती https://tinyurl.com/mrx3e5yn
8. औरंगजेबाची औलाद, देशद्रोही कृत्य म्हणत अधिवेशनात अबू आझमींच्या वक्तव्यावरून सभागृहात मोठा गदारोळ; दिवसभरासाठी कामकाज तहकूब https://tinyurl.com/3a2das5r अबू आझमीसारख्या माणसाला औरंगजेबाच्या कबरीच्या बाजूला झोपवलं पाहिजे; मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/n6ssctuw माझ्या शब्दांचा विपर्यास केला, तरीही माझे शब्द आणि विधान मागे घेतो; औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचं वक्तव्य अबू आझमींकडून मागे https://tinyurl.com/yfu2fz4s
9. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे स्त्रीलंपट, तृतीय पंथीयांशीही ठेवायचा संबंध! इतरही कारनामे समोर, पोलिसांना फिरकी देण्याचा केला प्रयत्न पण जाळ्यात अडकला https://tinyurl.com/3kfa98w6 रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, पुण्याच्या दिशेहून येणाऱ्या कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी https://tinyurl.com/3f2wthxm
10. चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान; कर्णधार स्मिथ आणि अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकांनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं https://tinyurl.com/ysrsc6s3 शुभमन गिलच्या सेलिब्रेशनवरून भर मैदानात वाद, ट्रॅव्हिस हेडचा झेल पकडताच अम्पायरला खेळाडूंची कृती खटकली https://tinyurl.com/2fux4my9
*एबीपी माझा स्पेशल*
संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी धनंजय मुंडेंचा संबंध नाही, नैतिकतेतून त्यांचा राजीनामा; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत पत्रक जारी! https://tinyurl.com/bdfbu7hx
वाघाच्या डोळ्यात डोळं घालून पाहिलं, बछड्यांना दूध पाजलं; वनतारा वाईल्डलाईफमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो
https://tinyurl.com/y4dy5xwx
रावाचा रंक कसा झाला? बलाढ्य धनंजय मुंडेंना 'या' आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला, पाहा A टू Z माहिती
https://tinyurl.com/mr2cjskm
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*