Chandrapur News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मतदार याद्यांमध्ये केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे देशात मोठं वादळ निर्माण झालं आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर देशात ठिकठिकाणी मतदार यादींमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप आणि दावे केले जात आहे. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस (Ghugus) शहरातून एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका बंद घरात 119 विविध जाती-धर्माचे मतदार असल्याचं समोर आलंय. एबीपी माझाच्या रिॲलिटी चेकमध्ये (Reality Check) हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर राज्यातच नाही तर देशात चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहर चर्चेत आलं. कारण चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरात एका बंद घरात 119 विविध जाती-धर्माचे मतदार असल्याचा प्रकार समोर आलाय. घुग्घूस शहरातील केमिकल वॉर्डातील सध्या बंद स्थितीत असलेले हे घर क्रमांक 350 आहे. हे घर सचिन उर्फ राजू बांदूरकर यांच्या मालकीचे असून या घरात विविध जाती-धर्माचे जवळपास 119 मतदार राहत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली? यावर मोठं वादंग उठलं. मात्र या आरोपानंतर एबीपी माझाने रिॲलिटी चेक केली असता त्यामध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

एबीपी माझाच्या रिॲलिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मतदार यादीत प्रचंड घोळ करत वोट चोरीचा आरोप काँग्रेसने केला. साहजिकच एबीपी माझाने या आरोपांच्या मुळाशी जाण्यासाठी 350 या घर क्रमांकावर असलेले 119 मतदार नेमके कुठे आहेत? ते बोगस तर नाही? याचा शोध घेतला आणि एबीपी माझाच्या रिॲलिटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर आलंय

मतदारांची नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे घोळ

काँग्रेसने केलेल्या आरोपांप्रमाणे हे मतदार बोगस नाहीत, तर मतदारांची नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे हा घोळ झाला आहे. घुग्गुस शहरातील हे मतदार खरे आहेत. मात्र BLO म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसरच्या चुकीमुळे वेगवेगळ्या प्रभागातील हे मतदार एकाच घर क्रमांकावर नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.

ही बातमी वाचा: