मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) सगळीकडे धूम आहे. संपूर्ण पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहेत. आमच्याच उमेदवाराचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार, असा दावा प्रत्येक पक्षाकडून केला जातोय. शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे (Thackeray Faction) आणि शिंदे गटाची (Shinde Faction) ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 4 जून रोजी नेमके चित्र स्पष्ट होणारच आहे. पण त्याआधी एबीपी- सी वोटर सर्वेच्या माध्यमातून या निवडणुकीचा संभाव्य निकाल समोर आला आहे. मतदानपूर्व चाचण्यांत शिंदे यांची शिवसेना या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Loksabha Election 2024 Opinion Poll) 


शिंदे गटाला किती जागा मिळणार (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Eknath Shinde Shiv Sena Seats)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकूण 9 ते 10 जागांवर विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे, भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती आहे. तिन्ही पक्ष एकदिलाने ही निवडणूक लढवत आहेत. परिणामी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकूण 9 ते 10 जागांवर विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


महायुतीला किती जागा मिळणार? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Mahayuti Seats)


ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार या लोकसभा निवडणुकीत महायुती बाजू मारण्याची शक्यता आहे. महायुतीचा भाग असलेल्या भाजपला एकूण 21 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 9 ते 10 जागा मिळू शकतात. महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज ओपीनियन पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलाय. म्हणजेच या निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी साधारण 30 ते 32 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? 


महायुती- 30 
महाविकास आघाडी- 18
---------------
एकूण जागा- 48


महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप- 21-22
शिवसेना (शिंदे गट)- 9-10
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 0
------------------
एकूण जागा- 30-32


महाविकास आघाडीला किती जागा? 


काँग्रेस- 03
शिवसेना ( ठाकरे गट)-  09-10
राष्ट्रवादी- (शरद पवार गट)-  05
--------------------
एकूण जागा- 18


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Uddhav Thackeray Shiv Sena seats)


दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा 9 जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीचा भाग आहे. महाविकास आघाडीत ठाकरे यांच्या वाट्याला एकूण 21 जागा आलेल्या आहेत. मात्र यातील 9 जागांवरच ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.