Maharashtra Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रातील एक्झिट पोलचा अंदाज समोर आलाय. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठी आघाडी मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 जागा मिळतील तर महायुतीला 24 जागा मिळतील असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला 9 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये वर्तवण्यात आलाय. उद्धव ठाकरे यांनी यावेळी 21 जागांवर आपलं नशीब अजमावलं होतं. 


ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची लढत - 


शिवसेनामध्ये उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षाची बांधणी करावी लागली. उद्धव ठाकरे यांना नवा पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ठाकरेंसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये 21 जागांवर निवडणूक लढवली आहे. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये उद्धव ठाकरे यांना नऊ जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय. 


उद्धव ठाकरे दोन वर्षांपूर्वी एनडीएसोबत फारकत घेत यूपीएमध्ये सामील झाले होते.  त्यानंतर पक्षही फूटला, चिन्ह गेले.. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला. राजकीय जाणकरांच्या मते राज्यात उद्धव ठाकरेंच्या सभा सर्वात प्रभावी झाल्या आहेत. त्याचा फायदा त्यांना निकालात दिसेल असाही अंदाज आहे. ठाकरे यांनी प्रतिष्ठेच्या लढतील सरासरी कामगिरी केल्याचा अंदाज दिसतोय. 


2019 मध्ये काय झालं ?


2019 लोकसभा निवडणूक एकसंध शिवसेने 22 जागांवर निवडणूक लढवली होती. ठाकरेंना 18 जागांवर यश मिळाले होते. पण त्यानंतर 2022 शिवसेनेत उभी फूट पडली. आमदार आणि खासदार दोन गटाच विभागले गेले. ठाकरेंसोबत फक्त खासदार राहिले होते. तर एकनाथ शिंदे यांना 13 खासदारांनी पाठिंबा दिला होता. 2014 लोकसभामध्ये ठाकरेंनी 21 जागांवर आपलं नशीब अजमावलं. त्यांना किती जागा मिळतील, हे 4 जून रोजी स्पष्ट होईल. पण त्याआधी आलेल्या एबीपी-सी व्होटरच्या एक्झिटपोलमध्ये ठाकरेंना 9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.  


राज्यात कुणाला किती जागा :


एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच झाल्याचं दिसले. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज
महायुतीला २४ तर मविआला २३ जागांचा अंदाज आहे. भाजप १७, तर शिंदे गटाला ६ जागांचा अंदाज आहे. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय मिळेल, असा अंदज आहे. मविआमध्ये काँग्रेसला ८, ठाकरे गटाला ९ जागांचा अंदाज आहे. शरद पवार गटाला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.


2024 मध्ये कुणाला किती जागा मिळणार ?


महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12


2024 लोकसभा निवडणुकीत कुणी किती जागा लढल्या ?-


भाजप - 28 
एकनाथ शिंदे - 15 
अजित पवार - 4
महादेव जानकर - 1
----------------
उद्धव ठाकरे - 21
काँग्रेस - 17 
शरद पवार - 10 


2019 च्या लोकसभेचा निकाल? 


2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला राज्यात 41 जगांवर यश मिळाले होते. भाजपने 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 आणि काँग्रेसला 1 म्हणजेचे युपीएने 5 जागा जिंकल्या होत्या. तर एमआयएम-वंचितने 1 जागा, अपक्षने 1 जागा जिंकली होती.


Disclaimer : ABP C व्होटर एक्झिट पोल सर्वेक्षण 19 जून ते 1 जून 2024 दरम्यान घेण्यात आला. त्याची सँपल साईज ही 4 लाख 31 हजार 182 इतकी आहे आणि हे सर्वेक्षण सर्व 543 लोकसभेच्या जागांवर करण्यात आले. त्यामध्ये देशातील 4,129 विधानसभा जागांचा समावेश आहे. ABP C व्होटर सर्वेक्षणाचे त्रुटीचे मार्जिन राष्ट्रीय स्तरावर +3 आणि -3 टक्के तर प्रादेशिक स्तरावर +5 आणि -5 टक्के इतकं आहे.