Aaditya Thackeray Abhijeet Dipake मुंबई : शिवाजी पार्क परिसरात आज नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तरुणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केलं. या प्रसंगी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी, अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरुन अभिजित दिपके यांनी मुंबईतील तरुणाईसोबत संवाद साधला. 

Continues below advertisement

आदित्य ठाकरेंच्या फोनवरुन अभिजित दिपकेंचा संवाद

आदित्य ठाकरेंनी अभिजित दिपके यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. कॉकरोच जनता पार्टी, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून समर्थन दिल्याबद्दल अभिजित दिपके यानं उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. आज सीजेपीच्य प्रवक्त्यांनी जे.पी. नड्डा यांची भेट घेत तीन मागण्या केल्याचं दिपके यानं सांगितलं. सीजेपी आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचं अभिजित दिपके म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्यासोबत संवाद साधताना राजीनामा घेऊनच व्यवस्था बदलायची आहे. हा नवा भारत आहे, झुकणार नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.  

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात जमलेल्या तरुणाईला मार्गदर्शन केलं. या चार दिवसात आपण याच जागेवर दुसऱ्यांदा भेटलो आहोत.  परवा दिल्लीला जाऊन आलो, आता रविवारी आपण भेटणार आहोत. आपण सर्व भारतीय आहोत, हीच ओळख आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपली ओळख विसरुन आपल्याला भीती दाखवून राज्य करत होते आजपर्यंत त्यांनी हे दृश्य पाहणं गरजेचं आहे. ही जन की बात दिल्लीला ऐकावी लागेल. दिल्लीमध्ये बेछूटपणे विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाला. सरकारच्या हातात बंदुका, लाठी असेल पण आमच्या हातात तिरंगा आहे. आम्ही तिरंगा घेऊन तुमच्यासमोर आहोत, बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं आहे, आपण सर्वजण त्यांचे आभार मानूयात. उपोषण संपलं आहे मात्र आंदोलन संपलेलं नाही. अभिजित दिपके आणि इतर युवक दिल्लीत आंदोलन करत आहेत. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, आदित्य ठाकरेंनी म्हटलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे तोपर्यंत शांत बसायचं नाही, असंही आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं. लाठीमार सहन केल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता काय?असा सवाल आदित्य ठाकरेंनी युवकांना केला.