Santosh Deshmukh Murder Case Beed: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली. यानंतर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सुरेश धस यांना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एका बडा नेत्याला 16 कॉल गेलेत?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मला या बड्या नेत्याबाबत माहिती नाही, असं सुरेश धस यांनी सांगितले. 


संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एका बड्या नेत्याला 16 कॉल गेलेत, असं सुरेश धस यांना माध्यमांशी विचारले. यावर बडा नेता कोण मला माहित नाही. मी देवाला प्रार्थना करतो त्यामध्ये आकाचे आका सापडू नये, ते नाही सापडणार मला वाटतं, मी आज तरी त्यांच्यावर आरोप करणार नाही, असं सुरेश धस यांनी स्पष्ट केले. तसेच अंजली दमानिया आता म्हणायला लागल्या. मी आधीपासून म्हणत होतो. संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ एका बड्या नेत्याला दाखवला गेला, असंही सुरेश धस म्हणाले. काही पोलीस अधिकारी यांना मदत करतायत. बीडचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, असं सुरेश धस यांनी सांगितले. 


आतापर्यंत चार आरोपींना अटक-


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोन आरोपींना तांबवा या गावातून ताब्यात घेतले होते, तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. विष्णू चाटे याला बीड येथे महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या होत्या. पण अजूनही तीन आरोपी फरार आहेत.


वाल्मिक कराड अजूनही फरार-


मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून वाल्मिक कराड फरार आहे. मात्र, तो सोमवारी संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत बीड पोलिसांसमोर आत्मसमपर्ण करेल, असे सांगितले जात आहे. वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच आहे की राज्याबाहेर आहे, याबाबत नेमकी माहिती नाही. तो राज्याबाहेर असल्यास मंगळवारी सकाळपर्यंत पोलिसांना शरण जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


सुरेश धस काय काय म्हणाले?, संपूर्ण पत्रकार परिषद, Video:



संबंधित बातमी: 


प्राजक्ता माळी आरएसएसच्या मुख्यालयात जातात तेव्हा...; सुषमा अंधारेंच्या विधानाने चर्चांना उधाण