मुंबई/रत्नागिरी : रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.

 

त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.

 

ब्रिटीशांनी बांधलेला हा पूल सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा जुना होता. हा पूल वापरण्यास असुरक्षीत आहे, असं पत्र दोन वर्षांपूर्वीच ब्रिटीशांनी पाठवल्याचा दावा काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी केला आहे.

 

दुसरीकडे मुंबई- गोवा महामार्गावरील सर्व पुलांचं ऑडिट करण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या महामार्गावर एकूण 21 पूल आहेत, त्यापैकी 15 पूल हे ब्रिटिशकालीन आहेत.

 

मुंबई- गोवा महामार्गावरील पूल

  1. जगबुडी पूल- 1943

  2. वाशिष्टी पूल- 1943

  3. आरवली पूल- 1932

  4. शास्त्री पूल- 1939

  5. सोनवी पूल- 1939

  6. सप्तलिंगी पूल- 1979

  7. बाव पूल- 1925

  8. अंजनारी पूल- 1931

  9. वाकेड पूल- 1931

  10. राजापूर पूल- 1944

  11. खारेपाटण पूल- 1946

  12. पिआली पूल- 1941

  13. बेळणा पूल- 1961

  14. जानवली पूल- 1934

  15. गड पूल- 1934

  16. कसाल पूल- 1934

  17. पिठढवळ पूल- 1957

  18. बांबर्डे पूल- 1938

  19. भंगसाळ पूल- 1968

  20. बांदा पूल- 1958


संबंधित बातम्या


महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?


LIVE : महाड पूल दुर्घटना : दोन एसटी बसमधील 22 जण बुडाल्याची भीती


महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार