Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केल्याचं दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 92.05 रुपये आणि डिझेलची किंमत 82.61 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 98.36 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 89.75 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.
चेन्नईमध्ये पेट्रोल 98.84 रुपये आणि डिझेल 87.49 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये आणि डिझेल 85.45 रुपये प्रित लीटर झालं आहे. भोपाळमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 100.08 रुपये प्रति लीटर असून डिझेलचे दर 90.95 रुपये लीटरवर पोहोचले आहेत.
गेल्या दोन महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु होत्या. यादरम्यान इंधन दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, यादरम्यान चार ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. निवडणुकांनंतर मात्र सात दिवसांतच इंधराचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचं पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे.
आठवडाभरापासून देशात इंधन दरवाढ कायम, परभणीत पेट्रोल 100.75 पैसे तर डिझेल 90.68 पैसे
मागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. आज आठव्या दिवशी 5 राज्याच्या निवडणूका झाल्या आणि देशभरात इंधन दरवाढ सुरु झाली. 8 दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून आज पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणी करांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नांदेडमध्ये पेट्रोल शंभरीपार; गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल दरात सतत वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे सामान्यांचे लॉकडाऊनमधील बजेट मात्र कोलमडलं आहे. आज नांदेड जिल्ह्यात पेट्रोल चे दर 100 रुपये 54 पैसे तर डिझेल दर 90 रुपये 49 पैसे झाले आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसलीय. काल पेट्रोलचे दर पेट्रोल 100 रुपये 4 पैसे होते, तर डिझेल 89 रुपये 92 पैसे होते. तर आज पेट्रोल मध्ये 51 पैशाने तर डिझेल मध्ये 57 पैशाने वाढ झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.