Parbhani News Update : परभणीच्या (Parbhani) मानवतमध्ये शेतकऱ्यांनी (Farmer ) बोगस कीटकनाशकं पकडली आहेत. या प्रकरणी मानवत पोलिसांनी बुलढाण्याच्या (Buldhana) मेहकर येथून एका कृषी केंद्र चालकाला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 17 लाख रूपयांचे बोगस कीटकनाशक जप्त करण्यात आले आहे. कृषी केंद्र चालकासह या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सतीश तरोडकर, दत्ता शिंदे, मुकेश राठी, श्रीराम गिरी आणि किशोर आंधळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मानवत परिसरामध्ये 9 ऑगस्ट रोजी एका कारमधून पेन्सी बायो या कंपनीचे बायो आर 303 हे बोगस फवारणी औषध विक्री केले जात असल्याची माहिती काही शेतकऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सुनील बावळे, अर्जुन पंडित या शेतकऱ्यांनी कारचा पाठलाग करून त्यांना पकडले. यावेळी 4 लाख 65 हजार 2376 रुपयांचे बोगस औषध असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानवत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
बुलढाण्यातील मेहकर येथून किशोर आंधळे याला अटक करण्यात आली होती. त्याची विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मेहकर येथील उटी या परिसरातून याच बायो आर कंपनीचे बोगस कीटकनाशक जप्त केले आहेत.पोलिसांनी 47 बॉक्स बोगस कीटकनाशक जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या बोगल किटकनाशकाची किंमत 17 लाख रुपये एवढी आहे.
यापूर्वी देखील 4 लाख 66 हजार रुपयांची बोगस औषधे आणि आता 17 लाख 30 हजार असा एकूण 22 लाख रूपयांची बोगस औषधे जप्त करण्यात आली असून या प्रकरणाी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने आणखी कुठे कुठे ही बनावट औषधे विक्री केली आहेत आणि किती प्रमाणात केली आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून याबाबत दोषींवर कोठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. आगामी काळात तरी अशा बोगस बीयाने आणि औषधांची विक्री करणाऱ्यांवर वचक बसेल असे मत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या