परभणी : विद्यार्थी दहावीचा असो बारावीचा किंवा इतर शाखेचा निकालाची धास्ती ही प्रत्येकालाच असते. परभणीच्या (Parbhani News) एका तरुणीने आपण नापास होऊ की काय या भीतीने त्याने निकाल लागण्यापूर्वीच आत्महत्या करण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे तरूणी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. थोडा धीर धरून तरूणीने आजचा निकाल पाहिला असता तर...अशी हळहळ तरूणीचे नातेवाईकही व्यक्त करत आहेत.


मागील आठवड्यापासून सोशल मीड‌ियावर बारावीच्या निकालाची चर्चा होती. संयुक्ता उबाळे असे या तरुणीचे नाव आहे. संयुक्ता ही परभणीच्या सेलुतील आहे. निकालाची धास्ती घेवून आत्महत्या केली. परभणीच्या सेलु शहरातील शाहू नगरात बालाजी उबाळे गेल्या 10 वर्षांपासून स्थायिक आहेत. त्यांना दोन मुली आहेत मोठी मुलगी चैत्राली अन लहान संयुक्ता..संयुक्ता नुतन महाविद्यालयात बारावीला वाणिज्य शाखेत होती. तिने नुकतीच परीक्षा ही दिली होती.


घरी कुणी नसताना उचलले टोकाचे पाऊल


 मात्र परीक्षेदरम्यान तिची तब्यत खराब झाली तरीही तिने पेपर दिले. मात्र निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला पेपर थोडे कठीण गेले. त्यामुळे आपण नापास होऊ अन् सोबतचे मित्र मैत्रिणी पुढे जातील. या विवंचनेतून तिने घरी कुणी नसताना निकालाच्या एक दिवस आधी म्हणजे 24 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली अन् घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. 


24 मे रोजी संयुक्ताने आत्महत्या केली अन् 25 मे रोजी तिचा निकाल आला. ज्यात तिला 52.17% गुण मिळाले आणि ती पास झाली. मात्र हा निकाल पाहायला ती आज जिवंत नाही. त्यामुळे तिने थोडा धीर धरला असता तर ती आज जिवंत असती त्यामुळे आज आमची संयुक्ता जरी आमच्यात नसली तरी इतर विद्यार्थ्यांनी धीर धरावा आणि कुठलेही पाऊल उचलण्या अगोदर कुटुंबाचा विचार करावा असे आवाहन तिच्या बहिणीने केला आहे. 


दरम्यान दोन दिवसांपूर्वी  आमच्या डोळ्यासमोर बागडणारी, हसत खेळत राहणारी संयुक्ता ही या जगात नाही यावर तिच्या आई अन वडिलांचा विश्वासच बसत नाही. संयुक्ता गेल्याने मनावर मोठा आघात झाला आहे. आई आणि वडिलांचे अश्रू थांबायचे नाव घेत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या परीक्षेत पास, नापास झाले तरी आयुष्याच्या परीक्षेत धीर धरून पुढे जाणे गरजेचे बनले आहे.


 नागपुरात बारावीत नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या 


बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे नागपुरात 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचभवन परिसरात घडली आहे. आकांक्षा सोनबरसे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षाचे आई-वडील खासगी काम करतात. गुरुवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल होता. त्यात आकांक्षा तीन विषयांत नापास झाली. त्यामुळे ती तणावात होती. गळफास घेण्यापूर्वी आकांक्षाने मानेवाडा परिसरात राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन करून आपण नापास झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सांगून मोबाइल बंद केला. त्यानंतर पंख्याच्या हुकला साडी बांधून गळफास घेतला.


हे ही वाचा :