Parbhani Bus Accident : परभणी (Parbhani) जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident) बातमी समोर येत असून, पुलावरून 50 फुट खोल खाली बस (Bus) कोसळली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली येथे जिंतूरहुन सोलापूरला जात असलेली बस नदीच्या पुलावरून खाली कोसळली आहे. या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. तर, सर्व जखमींना तात्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात (Jintur Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


जिंतुर-सोलापुर ही बस सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असतानाच अपघता झाला. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल 50 फूट खोल नदीपत्रात कोसळली. बस पलटी झाल्याने बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणेने तात्काळ या सर्व प्रवाशांना बाहेर काढुन खाजगी वाहनांतून उपचारासाठी ग्रामीण रुग्णलयात हलवले आहे. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले असून, यात काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 


थेट बस नदीत 50 फुट खाली कोसळली...


परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली नदीवरील पूल अपघाताचा केंद्र बनला आहे. कारण मागील काही वर्षात याठिकाणी सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, आज पुन्हा असाच अपघात समोर आला. नदीवरून जात असतांना चालकाचा नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीत 50 फुट खाली कोसळली. यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


स्थानिक मदतीला धावून आले...


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीला धावून आले. बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना तात्काळ बाहेर काढून, त्यांना खाजगी गाड्यांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक प्रवासी अपघाताच्या घटनेने घाबरून गेले होते, त्यामुळे त्यांना धीर देण्याचं काम देखील स्थानिकांनी केले. तसेच अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी देखील जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Sabarmati-Agra Train Accident: राजस्थानात साबरमती एक्स्प्रेस अन् मालगाडीची धडक; दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्यानं भीषण अपघात