Maratha Reservation : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. काही ठिकाणी हिंसक आंदोलने देखील सुरु आहेत. परभणीच्या पालम तहसील कार्यालयासमोर देखील मराठा आरक्षणासाठी नरसिंग रोकडे, ओमकार सिरस्कर आणि माणिक सिरस्कर हे तीन जण आमरण उपोषण करत आहेत. या तिघांनीही गेल्या पाच दिवसापासून अन्न आणि पाणी न घेतल्याने या तिघांपैकी माणिक रुस्तुमराव सिरस्कर वय 35 यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आंदोलन स्थळीच अचानक चक्कर आल्यानं उपोषणासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजवरून ते खाली पडले आहेत. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर दुखापत होऊन मार लागला आहे.


मराठा आरक्षणासाठी नरसिंग रोकडे, ओमकार सिरस्कर आणि माणिक सिरस्कर हे तीन जण आमरण उपोषण करत आहेत. या तिघांनीही गेल्या पाच दिवसापासून अन्न आणि पाणी घेतलं नाही. या तिघांपैकी माणिक रुस्तुमराव सिरस्कर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आंदोलन स्थळीच अचानक चक्कर आल्याने उपोषणासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजवरून ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर दुखापत होऊन मार लागला आहे. यावेळी त्यांना पालम ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, तिथे आरोग्य कर्मचारी नसल्याने उपचार मिळाले नाहीत. त्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.