Parbhani Crime News: परभणी (Parbhani) पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मुलांचे अपहरण (Kidnaps) करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. लहान मुलांना वेगवेगळी आमिषे दाखवून ही टोळी पळवून नेत होते. त्यानंतर मोठ्या रक्कमेत अपहरण केलेल्या मुलांना इतर राज्यात विकण्याचे काम त्यांच्याकडून केले जायचे. तर या प्रकरणी एकूण 11 जणांच्या आतंरराज्य टोळीला परभणी पोलिसांनी अटक केली. तसेच या टोळीच्या ताब्यात असलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाची सुटका देखील पोलिसांनी केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, केवळ पैशांसाठी जवळच्या नातेवाईकांच्या मुलांना आमिष दाखवून अपहरण करणाऱ्या टोळीचा परभणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  विशेष म्हणजे मुलांचे अपहरण केल्यावर ही टोळी त्यांचे इतर राज्यात विक्री करायचे. पोलिसांनी 11 जणांच्या आतंरराज्य टोळीला बेड्या ठोकल्या असून यात 4  महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे. तर पोलिसांनी या टोळीकडून 13 महिन्यापूर्वी अपहरण करण्यात आलेल्या साडे चार वर्षाच्या मुलाला हस्तगत करून पालकांच्या स्वाधीन केले आहे. 


पोलिसांनी 11 जणांना बेड्या ठोकल्या 


परभणी पोलिसांकडून स्थापन करण्यात आलेल्या मानवी तस्करी विभागाकडे मागच्या काही दिवसात परभणीत अपहरण आणि हरवलेल्या मुलांचा तपास देण्यात आला होता. दरम्यान पालम तालुक्यातील फळा येथील 4 वर्षाच्या मुलाच्या अपहरण प्रकरणाचे तपास देखील याच पथकाकडून सुरु होते. दरम्यान याच तपासात पोलिसांना दोन संशयित आरोपी मिळून आले होते. त्यांची अधिक चौकशी केली असता, मुलांचे अपहरण करून त्यांना विकणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत या टोळीतील 11 जणांना बेड्या ठोकल्या आहे. 


असं सुरु होतं रॅकेट


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील आरोपी मोठ्या शिताफीने आपल्या नातेवाईकांच्या मुलांना आमिष दाखवून त्यांचे अपहरण करायचे. तसेच अपहरण केल्यावर या मुलांना परभणी, मराठवाडा तसेच हैदराबाद, विजयवाडा इथे कार्यरत असलेल्या विविध लोकांना 80 हजार ते 5 लाखांपर्यंत विकायचे.  विशेष म्हणजे ज्यांना मुलबाळ नाही अशाच लोकांना हे रॅकेट अपहरण केलेले मुलं विकायचे. तर पोलिसांकडून या 11 आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस आणखी तपास करत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Prabhani : पन्नास खोके काय शंभर खोके आले तरी माझ्या खुर्चीसमोर ते मला ठेंगणे वाटणार : खासदार संजय जाधव