परभणी : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी वीर सावरकरांवर (Veer Savarkar) खालच्या भाषेत टीका केली असल्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणीच्या (Parbhani)  पूर्णा येथे संविधान गौरव सोहळ्यामध्ये बोलत असतांना जलील यांनी, सावरकर 'भगोडा' असून आम्ही त्यांना कधी मानत नाही, आणि मानणार नाही, असं वक्तव्य जलील यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे आता राजकीय पडसाद देखील उमटण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले इम्तियाज जलील? 


देशात सगळ्यात मोठा कोणी महापुरुष असेल तर ते डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आहे असं असदुद्दीन ओवैसी संसदेत म्हणाले होते. विशेष म्हणजे ओवैसी हे एकटे असे खासदार आहेत, ज्यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या इतर खासदारांच्या समोर उभं राहून हे वक्तव्य केले होते. मात्र, याचा त्यांना खूप त्रास झाला. कारण ते म्हणतात की, त्यांच्या नजरेत सावरकर महापुरुष आहेत. मात्र, अशा पळपुट्यांना आम्ही कधीच महापुरुष मानलं नाही आणि मानणार देखील नाही, असे जलील म्हणाले. 



संजय राऊतांची प्रतिक्रिया...


जलील यांनी केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. “इम्तियाज जलील यांचा पक्ष आणि भाजप पक्ष यांच्यात अंतर्गत संगनमत आधीपासूनच आहे. यांना बोलायला लावयाचं आणि त्यानंतर भाजप पक्षाने आंदोलन करून लोकांच्या भावना उद्दीपित करायच्या हे अनेक वर्षांपासून सुरु आहे. आम्ही मागच्या आठवड्यात स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासह सावरकर यांच्या घरी जाऊन आलो. आम्ही जाहीर केल्यावर देशाचे पंतप्रधान नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले. समोर सावरकर यांचे घर दिसत असतांना त्यांच्या निवासस्थानी, स्मारकस्थळी मोदींना जावे वाटले नाही. त्यामुळे सावरकर यांच्यावर अशाप्रकारे चिखलफेक करण्याची हिम्मत या महाराष्ट्रात होते असल्याचे राऊत म्हणाले. 



नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता...


सावरकर यांच्यावरून यापूर्वी देखील अनेकदा राजकारण झाले आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य असो, किंवा उद्धव ठाकर गटाला याच मुद्यावरून भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न असो, यावरून आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. अशात आता जलील यांनी सावरकर यांचा उल्लेख पळपुटे असा केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसच, पुन्हा एकदा भाजप या मुद्यावरून आक्रमक होण्याची देखील शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळीच धडकले तालमीत, पण क्रीडा अधिकारी मात्र घरातच; दादांनी फोन फिरवत झाप झाप झापलं