Parbhani News: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ परभणीत लावण्यात आलेले बॅनर्स युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले.एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर अगोदर या कार्यकर्त्यांनी ऑईल फेकले आणि जोरदार घोषणाबाजी करत हे बॅनर पूर्णपणे फाडून टाकले. शहरातील वसमत रस्त्यावर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मुरुंबा गावातील कैलाश झाडे आणि प्रमोद झाडे यांनी शिंदे साहेब समर्थक असे आशयाचे बॅनर्स लावले होते.याबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याना कळल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी जाऊन युवासेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यावर ऑईल टाकत बॅनर्स फाडले यावेळी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषाबाजीही करण्यात आली.


शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी बंड केल्याने राज्यातील शिवसैनिकांनी वेगवेगळ्या मार्गाने शिंदे गटाचा विरोध दर्शवला. त्यात अनेक ठिकाणी मोर्चे, ऑफिस तोडफोड, वेगवेगळे आंंदोनल, बॅनर्सवर काळं फासणे आणि सगळ्या आमदारांची अंतयात्रा काढून विरोध दर्शवला आहे. उद्या बहुमत चाचणी होणार आहे त्यानंतर  या सगळ्यांना पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे. 


पुण्यात देखील घडला असाच प्रकार


पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ फ्लेक्स लागला पण काही वेळातच मुख्यमंत्री ठाकरे समर्थकांनी तो फ्लेक्स फाडून टाकला. महापालिके समोरील चौकात हा फ्लेक्स आजच लागला होता, 'आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक' असा आशय त्यावर होता. याची कल्पना ठाकरे समर्थक शिवसैनिकांना मिळताच, त्यांनी काही वेळातच फ्लेक्स फाडला. यामुळं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार सचिन अहिर शहरात आले होते. उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी आयोजित मेळाव्यात अहिरांनी उपस्थिती लावली. शहरातील शिवसैनिकांनी एकजुठीने ठाकरेंच्या पाठीमागे उभ राहायचं, असा निर्धार करण्यात आला. मात्र त्यानंतर चोवीस तासाच्या आतच एकनाथ शिंदे समर्थनार्थ फ्लेक्स लागला अन तोच फ्लेक्स उद्धव ठाकरे समर्थकांनी फाडून टाकला. या प्रसंगामुळं शहरात ही ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे.