Sharad Ponkshe : अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे  चित्रपट,  मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. शरद पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय असतात. वेगवेगळ्या घडामोडींवरील तसेच विषयांवरील त्यांची मतं ते सोशल मीडियावर मांडतात. राजस्थानमधील उदयपूर(Udaipur) शहरात दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. उदयपूरमधील हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या घटनेबाबत आता शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे विचार नेटकऱ्यांना सांगितले आहेत.


शरद पोंक्षे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी लोकांना दिलेला संदेश दिसत आहे. 'प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली  तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्थान जगू शकेल' , असं या पोस्टमध्ये लिहिलेलं दिसत आहे. शरद पोंक्षे यांनी या पोस्टला कॅप्शन दिलं, 'जे उदयपूरमधे घडले ते पाहील्यावर स्वा.सावरकर पदोपदी आठवतात व त्यांचे विचार आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.' शरद पोंक्षे यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट केलं आहे. 


पाहा पोस्ट:






शरद पोंक्षे सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. तसेच, त्यांनी ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती.  शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं दुसरे वादळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. 


काय आहे उदयपूर प्रकरण? 


उदयपूर शहरात दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी भाजपनं आज राजस्थान बंदची हाक दिली आहे. उदयपूरची ही घटना समोर आल्यानंतर राजस्थान सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळं आरोपींना अटक केल्यानंतर तातडीनं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ADG अशोक राठोड, ATS आयजी प्रफुल्ल कुमार आणि एक SP आणि एका अतिरिक्त एसपीचा या तपासात समावेश करण्यात आला आहे.


हेही वाचा: