Pankaj Bhoyar On Manoj Jarange Patil:  मुंबईच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पण सरकार त्यावर सध्या कारवाई करणार नाही. ते देखील आपलेच बांधव आहेत, सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलकांशी चर्चा सुरू आहे. पण सध्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची सरकारची मानसिकता नाही. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून साखळी उपोषणस्थळी भेट दिली. सरकार म्हणून आंदोलकांना आश्वस्त करतो की सरकार ओबीसीमधून सरसकट मराठ्यांना आरक्षण देणार नाही. असे स्पष्टीकरण राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं आहे.


दुर्दैवाने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे


दुर्दैवाने मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. आपल्या मागण्या जबरदस्तीने सरकारकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमची विनंती आहे, आंदोलन सुरू झाले तेव्हा शुक्रवार, शनिवार, रविवार असे विकेंड आणि सुट्टीचे दिवस आले. मात्र आज सोमवार आहे. मुंबई फक्त राज्याची राजधानी नाही, तर देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथून देशभराचा उद्योग व्यापार चालवला जातो. 5000 लोकांचे आंदोलनाची परवानगी असताना, मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत पोहोचले आहे. दैनंदिन जीवनासह गणेशोत्सवामध्ये ही व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे.


हुल्लडबाज आंदोलकांवर  पोलिसांची नजर- पंकज भोयर


मराठा आंदोलनामुळे सीएसटीसह दक्षिण मुंबई भागात वाहतूक कोंडी  होणार नाही, याची काळजी मुंबई पोलीसांकडून घेतली जात आहे. हुल्लडबाज आंदोलकांवर  पोलिसांची नजर राहणार असल्याचे देखील गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोणाची रसद आहे, याची माहिती आमच्या नेतृत्वाकडे आहे. योग्यवेळी आमचे नेतृत्व त्याचा खुलासा करेल, असेही  गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.


पोलीस भरतीला बसलेले तरुणांचा चिखलात बसून अभ्यास


मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मोठ्या संख्येने नागरिक छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर जमले आहेत. या आंदोलनादरम्यान काही मराठा आंदोलक रस्त्यावर बसून पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत. भर चिखलात CSMT स्थानकावर तरुण पोलीस भरतीचा अभ्यास करताना दिसत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, "आज आरक्षण नसलं तर एक महिन्यानंतर पोलीस भरती येणार. त्याच्या आधी आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे सरकारने. नाहीतर आमचे पोरं लागणार नाहीत आणि वयोमानाची पण अट असते." आरक्षणाचा फायदा मिळाल्यास त्यांना मदत होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. यापूर्वी अनेकदा ते एका मार्काने भरतीतून वंचित राहिले आहेत.


92 गुण मिळवूनही संधी मिळ नाही


2017 साली एक मार्काने वेटिंग लिस्टवर होते आणि 92 गुण मिळवूनही त्यांना संधी मिळाली नाही. सध्या ते मुंबई आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरतीसाठी वेटिंग लिस्टवर आहेत. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून आरक्षण द्यावे अशी त्यांची विनंती आहे. हे एक शिलाळोता आंदोलन आहे, जिथे पोलीस भरतीला बसलेले तरुण चिखलात बसून अभ्यास करत आहेत.


संबंधित बातमी:


Manoj Jarange Patil Mumbai Morcha: CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; दक्षिण मुंबईतील वाहतुकीच्या अनेक मार्गात बदल