Pandharpur Wari 2025: राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली असून जूनमध्येच उजनी धरणाने पन्नाशी ओलांडल्याने या वेळेला मोठ्या प्रमाणात पाणी चंद्रभागेत येऊ शकणार आहे. अशावेळी हे पाणी पुढे तसेच सोडून देणेही तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे ठरणार असल्याचे पंढरपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. यामुळे जर तशी परिस्थिती आली तर वाळवंटात मोठ्या प्रमाणात पाणी पसरू शकणार आहे. अशावेळी काय नियोजन करायचे, हे पोलीस अधीक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन तो पर्यायी मार्गही तयार केला जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील धोकादायक फुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे सुरू असून जे धोकादायक पूल आहेत त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येईल. मात्र आषाढी काळात कुंभमेळ्याप्रमाणे तात्पुरता पूल उभारणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गंगेमध्ये पाण्याची पातळी एकसमान होती. मात्र इथे पावसावर पाण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते, अशावेळी हा पूल बनवून अचानक पाणी वाढल्यास आपुन पाण्याखाली बुडून जाईल. त्यामुळे असा फुल उभारणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
....तर हे पैसे वाया जातील
कुंभमेळा बारा वर्षातून एकदा येतो आणि केवळ मर्यादित दिवसांसाठी या पद्धतीचे पूल उभारण्यासाठी खर्च ही जवळपास चार कोटी रुपये इतका असून जर पाणी पातळी वाढली आणि पूल पाण्याखाली गेला तर हे पैसे वाया जातील. त्यामुळे अशा पद्धतीचा पूल उभा केला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. या संदर्भात सैन्य दलाशी ही संपर्क साधला होता. मात्र नदीचा स्पॅन जास्त असल्याने या ठिकाणी मिलिटरी जातात असा पूल उभारणेही शक्य नसल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले. दरम्यान एबीपी माझा ने दाखवलेल्या जुन्या दगडी पुलाच्या बातमीवर बोलताना जुन्या दगडी पुलावरील संपूर्णपणे वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले असून या पुलाच्या दोन्ही बाजूला मजबूत बॅरिगेटिंग केले जाईल आणि या पुलाचा वापर फक्त भाविकांना चालण्यासाठी ठेवला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गरजेनुसार या जुन्या दगडी पुलाला मजबुतीसाठी आधार देणे गरजेचे असेल तर तेही दिले जाईल मात्र गेल्या वर्षी प्रमाणे कोणतीही चेंगराचेंगरी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे सांगितले. चंद्रभागेच्या पात्रात भाविकांना दोन तीरावर जाण्यासाठी अजून एक पूल प्रस्तावित केला असून लवकरच याचे काम सुरू होईल असे संकेत त्यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या