पालघर : पालघरमध्ये (Palghar News)  आश्रम शाळेत (Ashram Shala) विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण करण्यत आली आहे.  दोन लाडू घेतले म्हणून विद्यार्थ्याला बेशुद्ध पडेपर्यंत काठीने मारहाण करण्यात आली आहे. मोखाडा तालुक्यातील कारेगावनमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून, पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणला जात होता.  या   घटनेमुळं शासकीय आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


सोमवरी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी कुटुंबांशी संवाद साधला. तर दुसऱ्या बाजूला मात्र एका शासकीय आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  धक्कादायक बाब म्हणजे हा विद्यार्थी बेशुद्ध पडेपर्यंत या निर्दयी शिक्षकाने त्याला काठीने मारहाण केली असून अधीक्षक आल्यानंतर या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रम शाळेत नववीत शिकणाऱ्या रुद्राक्ष दत्ता पागी याला ही मारहाण करण्यात आली असून ललित अहिरे या शिक्षकांनी ही मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले आहे.


तक्रार करू नये म्हणून आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव


सोमवारी रुद्राक्ष नेहमीप्रमाणे जेवण घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्या हातात दोन लाडू होते. तुझ्या हातात दोन लाडू कसे? याचा जाब विचारत रुद्राक्षला या शिक्षकाने बेदम मारहाण केली. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणला जात होता .  मात्र या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे . 


आश्रमशाळांमध्ये सुविधांची वाणवा


आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना नियमित चहा आणि  जेवण मिळत नसल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील बहुतांश मुलांना आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. आरोग्यसेवाही पुरविली जात नाही. त्यामुळेच आश्रमशाळात विद्यार्थ्यांचे मृत्यू होतात. असुविधांमुळे विद्यार्थी पळूनही जातात. शिक्षणाचा दर्जाही खालावला आहे. तेव्हा या सर्व गोष्टींकडे शासनाने लक्ष द्यावे, अशीही मागणी सातत्याने होत आहे. 


हे ही वाचा :