Palghar News: पालघर जिल्ह्यातील मुरबे पोर्ट प्रकल्पाने (Murbe Port Project) एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड व जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे उभारल्या जाणाऱ्या या ग्रीनफील्ड डीपवॉटर पोर्टसाठी मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल सादर करण्यात आला आहे. आता लवकरच सार्वजनिक सुनावणी होणार आहे.
पालघर जिल्ह्यातील मुरबे गावाजवळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. बंदराची एकूण क्षमता तब्बल 134 दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी असणार असून, सिमेंट, स्टील, एलपीजी, एनपीजी, कंटेनर अशा विविध प्रकारच्या मालाची हाताळणी येथे होऊ शकणार आहे. या बंदरासाठी 16 धक्के उभारले जाणार आहेत. तर सुमारे 10 किलोमीटर लांबीचा दक्षिण ब्रेकवॉटर आणि 1.3 किलोमीटर लांबीचा उत्तर ब्रेकवॉटर बांधण्याचे नियोजन आहे.
कसा असेल प्रकल्प? (Murbe Port Project)
1. एकूण जागा: 1035 एकर
2. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरशी 13 किमी रेल्वे मार्ग
3. एनएच-48 आणि मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाशी थेट जोडणी
स्थानिक मच्छीमारांनी केला होता विरोध-
जेएसडब्ल्यू कंपनीने 2015 मध्ये नांदगाव-आलेवाडी दरम्यान बंदर उभारणीचे प्रस्तावित केले होते. याला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केला होता. बंदराविषयीचे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीसाठी असताना जुलै 2023 मध्ये कंपनीने आपण बंदर या ठिकाणी उभारणार नसण्याचे हमीपत्र दिले. राज्य शासनाने ऑगस्ट 2023 मध्ये नवीन सागरी धोरणाच्या अनुषंगाने जेएसडब्ल्यूने ऑगस्ट महिन्यात नव्याने प्रस्ताव सादर केला. त्यात मुरबे समुद्र किनाऱ्यासमोरील उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले. त्यानुसार हे बंदर सातपाटी खाडीलगत उभारण्यास येणार आहे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मिळेल मोठी चालना-
या प्रकल्पासाठी पाणी सूर्य प्रकल्पातून घेण्यात येणार असून वीज पुरवठा महावितरणकडून केला जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे कोणतेही घर विस्थापित होणार नाही. एप्रिल 2026 मध्ये प्रकल्पाचे बांधकाम सुरू होऊन मार्च 2029 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे. मुरबे पोर्ट कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार; विमानतळही बांधणार, एकनाथ शिंदेंनी मागवला अहवाल