Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सव सुरू व्हायला अवघे 3 दिवस बाकी आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी विराजमान व्हायला सज्ज आहे. या निमित्त अवघ्या देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. पंचांगानुसार, 2025 मध्ये यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी सुख-समृद्धीचे दाता गणपती बाप्पा यांचे आगमन होईल. ज्योतिषशास्त्रानुसार देखील गणेशोत्सव हा अत्यंत खास असणार आहे, कारण ग्रहांच्या मोठ्या हालचाली होतायत, यावर्षी गणपती बाप्पा 3 राशींसाठी एक खास भेट घेऊन येत आहेत. कोणत्या असतील त्या भाग्यशाली राशी? जाणून घ्या...
गणेश चतुर्थीच्या दिवशी ग्रहांचा विशेष योगायोग..
ज्योतिषशास्त्रानुसार, 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र आणि वरुण ग्रह एक विशेष योग करत आहेत. शुक्र हा धन, समृद्धी, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्याचबरोबर आधुनिक ज्योतिषशास्त्रात वरुण ग्रहालाही महत्त्वाचे स्थान आहे.
नवपंचम योग
ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या शुक्र कर्क राशीत आहे आणि 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी शुक्र आणि वरुण एकमेकांपासून 120 अंशांवर राहून नवपंचम योग निर्माण करतील. गणेश चतुर्थीच्या दिवशी असा दुर्मिळ योग निर्माण झाल्याने 3 राशींचे भाग्य खुलेल. गणेशजींच्या आशीर्वादाने या लोकांना खूप फायदा होईल.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थी खूप शुभ राहील. तुम्हाला करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. दुःखाचे ढग दूर होतील. समस्या दूर होतील. तुम्ही जीवनाकडे एका नवीन दृष्टिकोनातून पहाल. घरात आनंद येईल.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, गणेश चतुर्थीला ग्रहांचे शुभ संयोजन कर्क राशीच्या लोकांना खूप फायदेशीर परिणाम देईल. नवीन स्रोतांकडून पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. करिअरमध्ये कठोर परिश्रमाचे फळ मिळेल.
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी गणपती बाप्पाचे आगमन अत्यंत फलदायी ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. नवीन योजना यशस्वी होतील. तुम्हाला संपत्ती, पद, प्रतिष्ठा, सर्वकाही मिळेल. प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन आलेत, पॉवरफुल धनयोग बनतोय! नोकरीत पगारवाढ, उत्पन्न वाढेल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)