पालघर :  पालघर जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. आज नामनिर्देशन पत्राची छाननी झाल्यानंतर एकूण 628  सदस्यासाठी 2099 उमेदवारी अर्ज  दाखल झाले होते. त्यापैकी 2091 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून 8 उमेदवारी अर्ज अवैध ठरले  आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्यासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने असे एकूण  30 सदस्य  बिनविरोध निवडून आले आहेत. तर सरपंच पदासाठी  पालघर तालुक्यातील टेंभी खोडावे  या ग्रामपंचायतीत  सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने येथील सरपंच पद बिनविरोध झाले आहे.  सरपंच पदासाठी  एकूण 294 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.  त्यापैकी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. 25 ऑक्टोबर रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र उमटणार आहे.


पालघर तालुक्यात तालुक्यात 16 ग्रामपंचायतच्या 186 सदस्यांच्या निवडीसाठी 509 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी  505 उमेदवारी अर्ज वैध ठरले असून चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले सरपंच पदासाठी  84 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते  यापैकी 82 उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर, दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.
डहाणू तालुक्यातील 17 ग्रामपंचायत 214 सदस्यासाठी 639 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते होते त्यापैकी 638 उमेदवारी अर्ज वैद्य ठरले ठरले तर एक अर्ज अवैध  ठरला. तलासरी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी 122  सदस्यासाठी 335 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरला.


पालघर तालुक्यातील टेंभीखोडावे ग्रामपंचायत मध्ये सरपंच बिनविरोध ठरला. तर, पालघर तालुक्यात 19 सदस्य बिनविरोध झाले आहेत.  जलसार, टेंभी खोडावे,  खानिवडे, सालवड  लाल ठाणे,  शिरगाव, या ग्रामपंचायतीच्या काही प्रभागातील हे उमेदवार आहेत, तलासरी व  डहाणू तालुक्यात प्रत्येकी तीन उमेदवार बिनविरोध झाले, विक्रमगड तालुक्यात एक  तर मोखाडा तालुक्यात  चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत असे एकूण 30 उमेदवार जिल्ह्यात बिनविरोध झाले. 


मराठा आरक्षणाचा ग्रामपंचायत निवडणुकीला फटका, परभणीत सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले


मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर विविध प्रकारची आंदोलनं सुरू आहेत. मात्र यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीलाही (Gram Panchayat Election) मराठा आरक्षणाचा फटका बसताना दिसून येतोय. परभणीतील वझुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि संरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या गावची निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. 


परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. सरपंच आणि 11 ग्राम पंचायत सदस्य अशा 12 जागांसाठी या निवडणुकीत एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातले तीन सरपंच पदासाठी तर 31 ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अर्ज होते. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार करत इथल्या सर्वच्या सर्वच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले.