Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर (Terror Attack) सर्वत्र यंत्रणा सजग झाली असून सर्व स्थरावरील हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव देखील खूप वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने काही कठोर निर्णय घेतले आहेत. याचा पाकिस्तानवर खोलवर परिणाम झाला आहे. दरम्यान, अद्यापही पाकिस्तानकडून (Pakistan) कुरापाती सुरुच असल्याचे समोर आले आहे.  पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेच्या अनेक भागात गोळीबार केला आहे.


परिणामी भारतीय सैन्याने देखील चोख प्रत्युत्तर देत जोरदार प्रतिवार केलाय. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LOC) काल (24 एप्रिलच्या) रात्री गोळीबार केलाय. याला भारताने  चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरच्या काही भागात शोध मोहीमही सुरू केली असून यातून दहशतवाद्यांचा शोध सध्या सुरू आहे. 


लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज पहलगामला भेट देण्याची शक्यता 


एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेच्या काही भागात गोळीबार केलाय. भारतानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोळीबारात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त सध्या तरी नाही. दरम्यान, भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे देखील आता सीमेला भेट देणार आहेत.
ते लवकरच उधमपूर आणि श्रीनगरला रवाना होऊ शकतात. ते येथे सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांना भेटतील, अशी माहिती पुढे आली आहे.


भारताच्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानला जबर धक्का


पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक कठोर निर्णय घेतेले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यात सिंधू पाणी करार पुढे ढकलला आहे. यामुळे पाकिस्तानचे आगामी फार नुकसान होणार हे अटळ आहे. दुसरीकडे भारताने अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावरही बंदी घालण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानच्या अधिकृत x हँडलवर भारतात बंदी घातली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरता कोंडीत सापडला आहे. अशातच भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असताना सरकार आणखीन काही कठोर पाऊले उचलेतंय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  



इतर महत्वाच्या बातम्या