Onion Price नाशिक : एकीकडे श्रीलंका सरकार ने आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे त्याचा फायदा होऊन कांद्याच्या भावात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र कांदा दरात सुधारणा होण्या ऐवजी घसरण सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परिणामी, लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे.
प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण
गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल 4 हजार 300 रुपये भाव मिळाला होता. आज त्याचं कांद्याला सरासरी 3 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाले असून लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असतांना त्यावर महागडी औषधे मारावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे.
मागील आठवड्यात लाल कांदा भाव(प्रति क्विंटल)
कमीत कमी - 1500 रू
जास्तीत जास्त - 5500 रू
सरासरी - 4300 रू
आजचे लाल कांदा भाव..
कमीत कमी - 1000 रू
जास्तीत जास्त - 5101रू
सरासरी - 3500 रू
फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढली
दुसरीकडे, तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. चक्रीवादळामुळे पावसाची भिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणला आहे. दरम्यान, कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. सर्वसाधारण कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ते तीन हजार रुपये भाव मिळतो आहे. तर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे.
काय भाव मिळाला?
सोमवारी ५८७ गाड्यांतून आला मार्केट यार्डात कांदा आला. ३०० गाडया भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवडपात होती. शेतकऱ्यांना १००० हजार ते ५००० हजार रुपये मिळाले. जुन्या कांद्याला साधारण ५००० हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला आहे. आगामी काही दिवसात अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला.
इतर महत्वाच्या बातम्या