लातूर: लातूरच्या सर्वोपचार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला महाविद्यालयाच्या विश्रामगृहातच अश्लील वर्तन करताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
श्यामसुंदर बिडवे असं या अधिकाऱ्याचं नाव असून मैत्रिणीला महाविद्यालयाच्या विश्रामगृहात आणून अश्लील चाळे करत होता. याची माहिती विद्यार्थ्यांना लागताच विद्यार्थ्यांनी बिडवेला रंगेहाथ पकडलं.
पोलिस आणि विद्यार्थी जमल्याचं पाहून बिडवेची नशा उतरली आणि तो माफीही मागू लागला. मात्र, आता हे प्रकरण पोलिसात गेलं असून पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे.