हेडलाईन्स:
सीबीएसई 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 2.00 वाजता जाहीर होणार: (एएनआय)
-------------------------------
नवी मुंबई महापालिकेतील 4 शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांचं निलंबन, मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई
-------------------------------
डोंबिवली स्फोटाच्या चौकशीसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना, महिन्याभरात अहवाल देणार
-------------------------------
दोन वर्षात सरकारविरोधात एकही आरोप नाही: अमित शाह
-------------------------------
मुंबई: लोअर परेलमधील कागदाच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना
-------------------------------
मुंबई: गरीब रथमध्ये प्रवाशांना मारहाण प्रकरण, पाच पँट्री कर्मचाऱ्यांना जीआरपीनं केलं अटक
-------------------------------
पुणे: ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचं आज सकाळी निधन, दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
-------------------------------
1. मध्य रेल्वेवरचा गोंधळ आजही सुरूच, नेरळदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं वाहतूक 10 ते 15 मिनीटे उशिरानं
-------------------------------
2. नाशकात तृप्ती देसाईंच्या गाडीवर दगडफेक, भूमाताच्या कार्यकर्त्या जखमी तर काल कपालेश्वर मंदिरात प्रवेशावरुन तृप्ती देसाई आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की
-------------------------------
3. डोंबिवली एमआयडीसीतल्या केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू, डोंबिवलीतून केमिकल कंपन्या हलवण्याचा सरकारचा विचार
-------------------------------
4. उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या तरी मोदींनाच पसंती, आयएमआरबीचा सर्व्हे, देशभरातही मोदींचीच हवा
-------------------------------
5. ममता बॅनर्जींचा आज शपथविधी, ४२ कॅबिनेट मंत्र्यांसह ममतांचा शपथविधी, पश्चिम बंगालमधील काँग्रेस आणि भाजपचा मात्र शपथविधीवर बहिष्कार
-------------------------------
6. ईडीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा भुजबळांना दणका, भुजबळ कुटंबातील 5 जणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
-------------------------------
7. मुंबईत सिंहांची नाही तर वाघाची सत्ता, प्रकाश मेहतांच्या वक्तव्याला सेनेचं सामनातून उत्तर, तर शिवसेनेच्या पोस्टरवॉरवर शेलारांचा पलटवार
-------------------------------
8. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबणीवर, हवामान खात्याची माहिती, केरळमध्ये 7 जूनला मान्सून दाखल होणार