नागपूरः महानगरपालिकेच्या शाळा सुरु होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्याप पोषण आहार पुरवठ्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे मनपा हद्दीतील सहा शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांना आहाराला मुकावे लागले. विद्यार्थ्यांना आहार कधी मिळेल, हे सांगण्यासही विभाग तयार नाही हे विशेष. मर्जीतील ठेकेदारांना काम देण्यासाठीच प्रक्रिया लांबविण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.


शाळांची वेळ बदलल्याने हा आहार मिळाला नसल्याचे सांगण्यात येत असले तरी पोषण आहार अधिक्षकांमुळेच निविद प्रक्रिया लांबल्याचा आरोप होत आहे. याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसत आहे. शहरातील 744 शाळांना शिजविलेला आहार सेंट्रल किचन पद्धतीने पुरविण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या होत्या. परंतु, मर्जीतील पुरवठादारांना कंत्राट देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर निविदा प्रलंबित ठेवत असल्याचे सांगण्यात येत आहे.


नियमानुसार पुरवठ्याचे कंत्राट शाळा सुरू होण्यापूर्वीच मिळायला पाहिजे होते. ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याने जुन्याच पुरवठादांना 15 दिवसांची अल्पमुदत वाढवून देण्यात आली. वेळेत निविदा प्रक्रिया झाली असती तर शेकडो विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी आहार मिळाला असता. विद्यार्थ्यांना आहारापासून वंचित राहावे लागत असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.


या चार शाळेत आहार नाही


जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, विनाअनुदानित दोन हजार 44 शाळांत पोषण आहार शिजविला जातो. बहुतांश, शाळेत पहिल्याच दिवशी आहार मिळाला. चार शाळांमध्ये हा आहार मिळाला नाही. दोन शाळांमध्ये विद्यार्थी नसल्याने तर दोन शाळांमध्ये स्वयंपाकीण हजर नसल्याने आहार मिळू शकला नसल्याची माहिती आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Speaker Assembly : एकनाथ शिंदेंनी पहिली लढाई जिंकली! आजचं कामकाज स्थगित; उद्या बहुमत चाचणीची परीक्षा; आज काय-काय झालं?


'शिंदेंनी माझ्या कानात जरी सांगितलं असतं तर मीच उद्धवजींशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं'; अजितदादांची टोलेबाजी अन् हशा


Maharashtra Politics : व्हिप झुगारून 39 आमदारांचे मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली; सुनील प्रभूंचा घणाघात


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI