Numerology Today 23 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांची प्रकृती आज ठीक नसेल, तुम्हाला बरं व्हायला थोडा वेळ लागू शकतो. तुमचं उत्पन्न कमी झाल्यामुळे तुम्ही पैशाशी संबंधित चिंतेत देखील असाल, त्यामुळे तुम्हाला यावर थोडं लक्ष द्यावं लागेल.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांना अजूनही त्यांचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करावे लागेल, यासाठी तुम्हाला आतापासून अधिक मेहनत करावी लागेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्याशी नीट वागणं आवश्यक आहे.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. आज तुमचं वैवाहिक आयुष्य चांगलं असेल. मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर तुम्ही फिटनेसचे क्लास घेत असाल तर लक्षात ठेवा की, यामुळे काही इजा होणार नाही. आज आहारावर विशेष लक्ष केंद्रित करावं लागेल.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज तुमचे वरिष्ठ तुम्हाला एकाच वेळी अनेक सल्ले देतील, हे तुम्हाला थोडं कठीण वाटेल, परंतु ते सल्ले तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. आज तुम्ही व्यस्त असाल आणि तुम्हाला घरच्या कामांसाठी वेळ मिळणार नाही.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला लाखो प्रयत्नांनंतर यश मिळेल, म्हणून प्रयत्न करत राहा. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. आज तुमचं आरोग्य चांगलं असेल आणि आज दिवसभर तुम्ही सजग आणि उत्साही असाल. जर तुमच्याकडे पैसे असतील तर सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा, ते तुमच्यासाठी चांगलं आहे. व्यवसायात आज नफा मिळेल.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. घरात काही छोटे शुभ कार्य होऊ शकते. घर आणि वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. म्हणून चांगली डील करून आणि सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ते खरेदी करण्याचा प्रयत्न करा.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांनी आज योग्य आहार घ्यावा. ज्या लोकांना कर्ज घ्यायचं आहे,त्यांना आज मंजुरी मिळेल. फिसमधील तुमच्या कामात सर्वजण तुम्हाला सहकार्य करतील.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आज तुमच्या आयुष्यातील तणावपूर्ण परिस्थिती यशस्वीपणे नियंत्रणात येईल. ज्या लोकांना थकवा जाणवत आहे, त्यांनी लांबच्या सहलींवर जाणं टाळावं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Astrology : नवीन आठवड्यात वृषभसह 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार; महालक्ष्मी योगामुळे राहणार कृपा